Mumbai News : घरीच झालेल्या प्रसूत झालेल्या महिलेची आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहात यशस्वी प्रसूती

माता आणि बाळ दोघांची प्रकृती ठिक


महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा आणि आरोग्य समिती अध्यक्षांनी भेट घेत मातेच्या प्रकृती केली चौकशी


मुंबई ( विशेष प्रतिनिधी): घरीच प्रसूती झाल्यानंतर मातेला बाळासह कुर्ला येथील डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात दाखल करत यशस्वी प्रसूती प्रक्रिया पार पडली. माता आणि बाळ दोघांची प्रकृती ठिक असून या मातेची प्रसूतीगृहात जाऊन मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे आणि महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुरडे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली.


यावेळी हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचीही विचारपूस केली. तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुरडे यांनी मातेशी संवाद साधत तिच्या प्रकृतीची चौकशी घेतली. तसेच नवजात बाळाला उचलून घेत मातेला वैद्यकीय उपचार योग्यप्रकारे मिळतील याची काळजी घेतली जावी अशा सूचना केल्या.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित २२ वर्षीय महिलेची प्रसूत गुरुवारी ९ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता राहत्या घरी झाली. जन्म दिलेल्या बाळाचे वजन सुमारे २.४ किलो आहे. मात्र प्रसूतीनंतर नाळ बाहेर न आल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात आणले.


रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने आवश्यक उपचार सुरू केले. कर्तव्यावरील नर्सने बाळाची नाळ कापली, सध्या माता आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही प्रसूतीनंतरची गुंतागुंत आढळलेली नाही.


यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून रुग्णाच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली. माता आणि बाळ दोघांचीही योग्य काळजी घेतली जात असल्याची खात्री करून घेत, आवश्यक वैद्यकीय उपचार व निरीक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

Comments
Add Comment

BMC News : एकाच पदावर १० ते १२ वर्षांपासून काम करणाऱ्यांच्या त्वरीत बदली करा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील विविध खाते आणि

BMC News : महापालिकेच्या भूखंडावरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या माहितीचा मासिक अहवाल मागवला

सुधार समितीच्या पटलावर अहवाल ठेवण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

BMC Fire Brigade : अंधेरीतील अग्निशमन दल आणि महापालिका चौकीचे आरक्षण वगळण्याचा प्रयत्न

आरक्षण बदलाचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला आरक्षण नको असे रिमार्क देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी

Mumbai Cleanliness Workers : मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या कामांची व्याप्ती वाढली

आता खुल्या आणि बंदिस्त नाल्यांसह अंतर्गत गटारांचीही करावी लागणार स्वच्छता शौचालयांच्या देखभाल आणि स्वच्छतेचे

BMC Ganeshotsav : मुंबईतील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर

रितू तावडे यांनी केली पाहणी, महापौरांनी व्यक्त केले समाधान मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणरायाचे आगमन आणि

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंडळांनी विशेष महाआरती!

मुंबईतील १२ हजार गणेश मंडळांना गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन ! मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदू संस्कृती आणि सण