Friday, September 11, 2026

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या
मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून १२ हॉलिडे स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईवरून कोकणामध्ये जाणाऱ्या नोकरदारांसाठी १२ गणपती विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेचे आरक्षण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून या हॉलिडे स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून गणपती स्पेशल ट्रेन्स १२ सप्टेंबरपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दिवा, पनवेल आणि पुणे अशा वेगवेगळ्या पाच स्थानकांतून ट्रेन सोडल्या जाणार आहेत. यामुळे कोकणवासीयांना गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 01151 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01447 डाऊन पुणे- रत्नागिरी एक्स्प्रेस, 01171 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 09110 विश्वामित्री- रत्नागिरी एक्सप्रेस, 09019 डाऊन मुंबई सेंट्रल- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01153 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- रत्नागिरी एक्स्प्रेस, 01103 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01167 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी एक्स्प्रेस या एक्स्प्रेस १२ सप्टेंबरपासून धावणार आहेत.   याशिवाय, मेमू ट्रेन्स सुद्धा मध्य रेल्वेकडून सोडल्या जाणार आहेत. 01155 डाऊन दिवा- खेड मेमू ट्रेन, 01133 डाऊन दिवा- चिपळून मेमू ट्रेन आणि 01103 डाऊन पनवेल- चिपळून मेमू ट्रेन अशा तीन वेगवेगळ्या मार्गांवरून मेमू ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या गणपती विशेष ट्रेन्समुळे गणेशभक्तांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतेच मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून या विशेष ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे. १२ सप्टेंबरला या गणपती विशेष ट्रेन्स आपल्या ठिकाणावरून कोकणामध्ये जाण्यासाठी रवाना केल्या जाणार आहेत. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिले रिझर्व्हेशन करूनही अनेकांना तिकिट उपलब्ध होत नाही. याच आधारावर आता मध्य रेल्वेने गणेभक्तांसाठी विशेष ट्रेनची सोय केलेली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >