Saturday, October 24, 2026

कोकणवासीयांनो, सावंतवाडी- मुंबई CSMT ट्रेनच्या वेळेमध्ये बदल; कधीपासून लागू होणार नवा टाइम टेबल?

Sawantwadi- Mumbai CSMT Express Time Change: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सावंतवाडी रोडवरून मुंबई सीएसएमटीकडे दररोज धावणाऱ्य एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सावंतवाडी रोडवरून मुंबई सीएसएमटीकडे दररोज धावणाऱ्य एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. 15088 अप सावंतवाडी रोड- मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये हा बदल करण्यात येणार नसून दिवाळीनंतर एक्स्प्रेसच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे. एक्स्प्रेसचं हे वेळापत्रक नेमकं केव्हापासून लागू होणार आहे, जाणून घेऊया...

मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज धावणारी एक नवीन एक्स्प्रेस मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस दररोज मध्यरात्री 11.55 मिनिटांनी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटते आणि सावंतवाडी रोड स्थानकावर दुपारी 02.15 मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी ही एक्स्प्रेस सावंतवाडी रोड स्थानकावरून दररोज सायंकाळी 05.20 मिनिटांनी सुटते आणि मुंबई सीएसएमटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 06.40 वाजता पोहोचते. ही एक्स्प्रेस दररोज धावत असल्यामुळे कोकणवासीयांना फार मोठा दिलासा मिळतो. पण आता ह्या एक्स्प्रेसच्या परतीच्या प्रवासाच्या वेळेमध्ये बदल होणार आहे.

15088 अप सावंतवाडी रोड- मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस 09 सप्टेंबर 2026 पासून दररोज सावंतवाडी रोड स्थानकावरून पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे सुटते. तर, आता 21 ऑक्टोबर 2026 पासून साध्या वेळापत्रकानुसार, सायंकाळी 06.40 वाजता सुटते. तर, आता नव्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी रोड- मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस 15 डिसेंबर 2026 पासून सावंतवाडी रोड स्थानकावरून सायंकाळी 06.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सीएसएमटी स्थानकावर सकाळी 06 वाजता पोहोचेल. नेहमीच्या वेळेप्रमाणे ही एक्स्प्रेस 20 मिनिटे आधी सुटणार आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये कोकण रेल्वेने वेळापत्रकामध्ये बदल केला नसून सणासुदीनंतर वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >