BMC News : एकाच पदावर १० ते १२ वर्षांपासून काम करणाऱ्यांच्या त्वरीत बदली करा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील विविध खाते आणि विभागांमध्ये जे अधिकारी १० ते १२ वर्षांपासून एकाच जागी आहेत, तसेच बढती मिळाल्यांनतरही त्याच विभागात आणि खात्यांमध्ये आहेत, त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी. सध्या अभियंता पदाची बदली ही ऑनलाईन पध्दतीने केली जात असून त्यामध्ये अशाप्रकारच्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात आहेत त्यांची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत.


मुंबई महापालिकेतील पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पअंतर्गत धरणाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक केली आहे. या सल्लागाराच्या नेमणूक ही निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धात्मक पध्दतीने ही निवड झाली आहे. मात्र, यापूर्वी १५ कामांमध्ये टाटा कन्सल्टंन्सी कंपनीला सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आल्यानंतर अशाप्रकारच्या सल्लागार सेवेसाठी निविदा काढण्यात आली आहे. यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. यापूर्वी निविदा न काढता सल्लागाराची नेमणूक करण्यात आल्याने महापालिकेचे नुकसान झाले असून आता महापालिकेला उपरती झाली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा प्रकल्प आणि मलनि:सारण प्रकल्प आदी विभाग हे सर्वांत जास्त भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिका गटनेते अश्रफ आझमी यांनी केली. तसेच मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात यावे. या विभागांतील अधिकाऱ्यांनी बऱ्याच कंपन्यांना सेट केल्याचाही आरोप केला. यावर अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी गारगाई धरणासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार का नेमणे आवश्यक आहे आणि त्या कंपनीची कशाप्रकारे निवड केली याची माहिती दिली.



यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे ज्या ज्या म्हणून विभाग तसेच खात्यांमध्ये दहा ते बारा वर्षांपासून एका जागेवर अधिकारी तथा अभियंते बसलेले आहेत त्यांची त्वरीत बदली करण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी. तसेच अभियंत्यांची बदली ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करताना जे जे म्हणून अभियंता संवर्गातील अधिकारी असतील त्यांचीही प्राधान्याने बदली करण्याचा प्रयत्न केला जावा असेही निर्देश दिले.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या भूखंडावरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या माहितीचा मासिक अहवाल मागवला

सुधार समितीच्या पटलावर अहवाल ठेवण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

BMC Fire Brigade : अंधेरीतील अग्निशमन दल आणि महापालिका चौकीचे आरक्षण वगळण्याचा प्रयत्न

आरक्षण बदलाचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला आरक्षण नको असे रिमार्क देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी

Mumbai Cleanliness Workers : मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या कामांची व्याप्ती वाढली

आता खुल्या आणि बंदिस्त नाल्यांसह अंतर्गत गटारांचीही करावी लागणार स्वच्छता शौचालयांच्या देखभाल आणि स्वच्छतेचे

BMC Ganeshotsav : मुंबईतील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर

रितू तावडे यांनी केली पाहणी, महापौरांनी व्यक्त केले समाधान मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणरायाचे आगमन आणि

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंडळांनी विशेष महाआरती!

मुंबईतील १२ हजार गणेश मंडळांना गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन ! मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदू संस्कृती आणि सण

Mumbai News : घरीच झालेल्या प्रसूत झालेल्या महिलेची आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहात यशस्वी प्रसूती

माता आणि बाळ दोघांची प्रकृती ठिक महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा आणि आरोग्य समिती अध्यक्षांनी भेट घेत मातेच्या