Bank Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून सलग सुट्ट्या, अनेक राज्यांत बँका काही दिवस बंद राहणार

नवी दिल्ली: बँकेत महत्त्वाचं काम असेल तर ग्राहकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी एकदिवसीय संपाची हाक दिल्यामुळे आज बँकांच्या नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यानंतर 12 सप्टेंबरला शनिवार आणि 13 सप्टेंबरला रविवार असल्याने बँकांना नियमित सुट्टी असेल. त्यातच काही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त पुढील दिवसांनाही बँका बंद राहणार आहेत.


युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) कडून बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे आठवड्यातील कामकाज केवळ 5 दिवसांचे असावे. म्हणजेच शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बँकांना पूर्ण सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.


याशिवाय कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजनेचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर कराव्यात, पेन्शनमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करावी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याशी संबंधित तरतुदी लागू कराव्यात, अशा मागण्या बँक कर्मचारी संघटनांनी केल्या आहेत.



मागण्या मान्य न झाल्यास 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान 3 दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर 26 ऑक्टोबर 2026 पासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.


दरम्यान, बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. IMPS, NEFT, RTGS आणि UPI सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे GPay, PhonePe आणि Paytm सारख्या माध्यमातून पैसे पाठवता येतील.


याशिवाय ATM मधून पैसे काढणे, ऑनलाइन वीज, पाणी आणि गॅस बिल भरणे तसेच मोबाइल रिचार्ज करण्यासाठी नेट बँकिंग किंवा बँकेच्या मोबाइल अॅपचा वापर करता येईल. SBI आणि पंजाब नॅशनल बँकेनेही ग्राहकांना संपाबाबत माहिती दिली आहे.


Comments
Add Comment

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल; पंतप्रधान मोदींसोबत आज महत्त्वाची द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले

9/11 Attack : 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आठवले स्वामी विवेकानंद; सहिष्णुतेचा संदेश पुन्हा चर्चेत

नवी दिल्ली : अमेरिकेतील 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना 25 वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान

BRICS Summit 2026 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात; पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकीत 'या' क्षेत्रांवर भर

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले असून, ब्रिक्स शिखर

E commerce rules : ई-कॉमर्स क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नवे नियम जाहीर; ग्राहक संरक्षण मजबूत होणार, सुधारित नियम..... पासून लागू

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल बाजारपेठेत पारदर्शकता

Social Media : १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध? सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : १८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सुरक्षेचे कठोर उपाय करण्याची मागणी करणारी याचिका

BRICS Summit 2026 : ब्रिक्स शिखर परिषद २०२६ नवी दिल्लीत सुरू; विविध राष्ट्रीय हितसंबंधांत सहमती घडवून आणण्याचे जगासमोर मोठे आव्हान

नवी दिल्ली : युद्ध, आर्थिक निर्बंध, व्यापारातील वाढते अडथळे आणि पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर