EPFO New Rules : EPFOचा मोठा निर्णय! PFमधून पैसे काढणे झाले सोपे; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी PF खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. गरजेच्या वेळी PFमधून अंशतः रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट करण्यात आली असून, आता आजारपणावरील उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा घर बांधकाम यांसारख्या विविध कारणांसाठी सहजपणे PFमधून पैसे काढता येणार आहेत.


नव्या नियमांनुसार PF अॅडव्हान्सचे तीन मुख्य गट करण्यात आले आहेत. यामध्ये आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थितींचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्या कारणासाठी किती वेळा पैसे काढता येतील, याबाबतचा संभ्रम कमी होणार आहे. (EPFO New Rules)



वैद्यकीय उपचार किंवा मेडिकल इमर्जन्सीची गरज असल्यास सदस्याला PFमधून अॅडव्हान्स घेता येईल. या कारणासाठी पैसे काढण्यावर ठराविक वेळेची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. म्हणजेच गरज पडल्यास पात्र सदस्य अनेक वेळा PF अॅडव्हान्स घेऊ शकतो.


मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा अभ्यासाच्या खर्चासाठी PFमधून अॅडव्हान्स घेता येतो. मात्र, संपूर्ण नोकरीच्या काळात या कारणासाठी जास्तीत जास्त १० वेळा पैसे काढण्याची सुविधा आहे. (EPFO New Rules)


स्वतःचं लग्न, मुलांचं लग्न किंवा भाऊ-बहिणीच्या लग्नासाठी PFमधून पैसे काढता येतील. या कारणासाठी संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त ५ वेळा PF अॅडव्हान्स घेता येईल.



घर किंवा प्लॉट खरेदी, घर बांधणं, होम लोनची परतफेड तसेच घराची दुरुस्ती किंवा रिनोव्हेशन यासाठी PF अॅडव्हान्स घेता येईल. या कारणांसाठी सेवाकाळात जास्तीत जास्त ५ वेळा पैसे काढता येतील. विशेष परिस्थिती किंवा इमर्जन्सीसाठी मात्र २ वेळा पैसे काढण्याची मर्यादा आहे. (EPFO New Rules)


नव्या नियमांनुसार, पात्र सदस्य आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर आपल्या एकूण EPF शिल्लक रकमेपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम अॅडव्हान्स स्वरूपात काढू शकतो. यासाठी सदस्याने EPF खात्यात किमान १२ महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे अचानक आर्थिक अडचण किंवा गरज निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या PF खात्यातील निधीचा अधिक सहजपणे वापर करता येणार आहे. (EPFO New Rules)


Comments
Add Comment

Disha Salian Case : आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोलीला अटक करा!

- दिशा सालियनच्या वडिलांची मागणी; उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘सीबीआय’ने नोंदवला जबाब मुंबई : दिशा सालियन

Farmer Loan Waiver Scheme 2026 : कर्जमुक्तीसाठी ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३८६ गणपती विशेष गाड्या जाहीर, कोकणासाठी ४ अतिरिक्त गाड्यांची भर

मुंबई :

R Madhavan US Open : आर. माधवनने अनुभवला यूएस ओपनचा रोमांच; आर्थर ॲश स्टेडियमवर ठरला एकमेव भारतीय सेलिब्रिटी

मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरात ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या

Sangli News : कृष्णेच्या डोहात ८ फूट लांबीच्या मगरीचा वावर; औदुंबर घाटावर भाविकांची गर्दी

सांगली : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या तब्बल ८ ते १० फूट लांबीची मगर वावरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज

Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या अतरंगी वक्तव्यांमुळे, सोशल मीडियावरील