BRICS Summit 2026 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात; पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकीत 'या' क्षेत्रांवर भर

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले असून, ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासोबतच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारत आणि रशियामधील व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या दौऱ्यात विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्यासोबत रशियाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात आले आहे. ( India Russia Relations)



भारतामध्ये दाखल झाल्यानंतर पुतिन यांचे विमानतळावर राज्यमंत्री के. व्ही. सिंग यांनी स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत पुतिन यांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली. भारत आणि रशियामधील संबंध हे विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त सामरिक भागीदारीवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. ( Vladimir Putin)


फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाबाहेर आयोजित होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत पुतिन यांचा हा पहिलाच प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेत अन्न, ऊर्जा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या पुरवठा साखळ्यांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


जागतिक पातळीवर रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित परिस्थिती तसेच अमेरिकेच्या व्यापार आणि शुल्क धोरणांचा परिणाम होत असताना ही ब्रिक्स परिषद महत्त्वाची मानली जात आहे.( PM Modi)





दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात व्यापक द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या बैठकीत संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, 20 ची कचोरी पडली 20 लाखांना; कसं काय CCTV व्हिडिओमधून प्रकार उघड

जयपूर : अवघ्या 20 रुपयांची कचोरी खाण्यासाठी थांबलेल्या एका कलेक्शन एजंटला तब्बल 20 लाख रुपयांचा फटका बसल्याची

सुप्रीम कोर्टात नोकरी मिळवण्याची संधी! पात्रता, पगार आणि अर्जाची संपूर्ण माहिती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India) मध्ये 'कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)' या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, सरकारी

नोएल टाटा १२ नोव्हेंबरला सहा कंपन्यांच्या मंडळातून पायउतार होणार , टाटा सन्सवर कायम

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा १२ नोव्हेंबर २०२६ रोजी टाटा समूहाच्या सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून

Andhra Odisha Cyclone : 'अर्णब' चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशात प्रचंड हाहाकार; विशाखापट्टणममध्ये १८ तासांत ढगफुटीसदृश पाऊस, ३ जणांचा मृत्यू तर ८७ हजार नागरिकांचे स्थलांतर

विशाखापट्टणम : बंगालच्या उपसागरात आकारास आलेल्या 'अर्णब' या अतितीव्र चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या

Cyclone Arnab : अर्नब चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले, कमकुवत होण्यास सुरुवात

Cyclone Arnab : अत्यंत तीव्र चक्रीवादळ अर्नबने बुधवारी पहाटे आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर धडक दिली. पहाटे दोन ते

Central Government Employes: केंद्रीय सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यामध्ये 3 % ने वाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय