Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; आयशर ट्रकला ट्रॅक्सची धडक, 8 मजुरांचा जागीच मृत्यू

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्स गाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅक्समधील 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्तीसगडमधील मजुरांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ( Bhandara Accident News)


मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. पिंपळगाव परिसरातील एका पेट्रोल पंपावरून आयशर ट्रक महामार्गावर येत होता. याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. (Accident News)



दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्स गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. (Truck Accident)


गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.


या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


Comments
Add Comment

Pune Ganeshotsav : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात ‘या’ दिवसांमध्ये दारूविक्री बंद, आदेश जारी

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून, पुणे शहरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी

Nanded Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! ट्रक-टाटा मॅजिकची जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 'मोदी एक्सप्रेस' आज रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मोदी एक्सप्रेस' शुक्रवारी

Jalna Kunbi Certificate : जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण; ९९.९ टक्के अर्ज मंजूर झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि कुणबी जात प्रमाणपत्र वितर

Maharashtra ports development : राज्यातील बंदरे आणि जलवाहतुकीला 'अर्थबळ' - १७० कोटींचा निधी मंजूर!

रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या १०४ कामांना मंजुरी मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील