Worms in protein powder : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या खळबळ उडवली आहे. कारण अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका न्यूट्रिशन प्रोडक्टमध्ये चक्क लहान अळ्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बिपाशाने याप्रकरणी थेट महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर अन्...
बिपाशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला. बिपाशानं आपला व्हिडीओ थेट महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे (FDA Commissioner Tukaram Munde) यांना टॅग केलाय आणि या भेसळीच्या किंवा दूषित उत्पादनाच्या प्रकाराबाबत त्यांच्या मदतीची विनंती केलीय. या व्हिडीओमध्ये, बिपाशा प्रोटिन पावडर एका ग्लासमध्ये ओतते आणि त्यातील लहान अळ्या दाखवते. तिनं असं स्पष्ट केलंय की, तिनं नुकतंच ते कंटेनर उघडलेलं आणि त्यात तिला मोठ्या संख्येनं अळ्या आढळल्या होत्या. बिपाशा बासू एका कीटकाला आपल्या बोटावर घेऊन त्याचा 'क्लोज-अप' शॉट दाखवते. बिपाशा बासू हिनं तिच्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांना टॅग केलं असून, त्यांना यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. पण, बिपाशा बासू हिनं व्हिडीओ शेअर करत केलेल्या दाव्याची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.
मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अध्यात्म, संतपरंपरा आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना ...
आता तुम्हीच आमची शेवटची आशा...
बिपाशा बासूनं व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, "तुकारामजी, आम्हाला भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादनं मिळू नयेत, यासाठी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात..." अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून युजर्सना धक्का बसलाय. या तक्रारीच्या अनुषंगानं एफडीएनं (FDA) संबंधित न्यूट्रिशन ब्रँडवर काही कारवाई केली आहे की नाही, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असं आवाहनही अभिनेत्री बिपाशा बासूनं तुकाराम मुंढे यांना केलं आहे. यापूर्वी, श्वेता तिवारी हिनं ऑनलाइन मागवलेल्या ड्रिंकमध्ये झुरळ आढळलं होतं. तेव्हा तिनंही अशा निष्काळजीपणाविरुद्ध कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र एफडीए आयुक्तांकडे दाद मागितली होती.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईकडे लक्ष
महाराष्ट्रातील अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांची सध्या चर्चा आहे. विविध ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी, स्वच्छतेचे नियम आणि अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन याबाबत कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता बिपाशा बासूने केलेल्या या गंभीर दाव्यानंतर एफडीएकडून नेमकी काय दखल घेतली जाते आणि संबंधित उत्पादनाची तपासणी होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.