Nilesh Rane : गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन नको!

- आमदार निलेश राणे यांचे आवाहन; कायदा-सुव्यवस्थेसाठी सरकारची तयारी, आंदोलकांनीही सहकार्य करावे


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येत असताना गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन होऊ नये, अशी अपेक्षा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र मुंबईत आल्यानंतर सर्व नियमांचे पालन करावे आणि भाषेचे भान ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन हे आंदोलनाच्या स्वरूपातच झाले पाहिजे, असे न्यायालयानेही म्हटले असल्याचे राणे यांनी सांगितले. (Nilesh Rane)


आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गणेशभक्तांकरीता ‘शिवसेना एक्स्प्रेस’ शनिवारी कुडाळसाठी रवाना झाली. या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, जरांगे पाटील हे अनेकांचे नेते आहेत, त्याचप्रमाणे इतर नेतेही कोणासाठी तरी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याबद्दल वाईट भाषा वापरल्यास ती त्यांच्या समर्थकांप्रमाणेच आपल्यालाही सहन होणार नाही. त्यामुळे जरांगे यांनी आपली भाषा नीट ठेवावी, एवढीच आपली विनंती असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. (Nilesh Rane)



जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, सरकारने न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे राणे यांनी सांगितले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार सर्व तयारीने सज्ज असल्याचे महाधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले आहे. सरकारकडून कायदा-सुव्यवस्था आणि अन्य व्यवस्था नीट ठेवली जाईल; मात्र आंदोलकांकडूनही तेवढेच सहकार्य मिळणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंकडून सहकार्य झाले तर आंदोलनही त्यांना यशस्वीपणे करता येईल, असे राणे यांनी सांगितले. (Nilesh Rane)



दरम्यान, बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचा सीबीआयने जबाब नोंदवून त्यात आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांची नावे घेतल्याच्या प्रश्नावर राणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणात कोण आरोपी आहे किंवा कोणाचे नाव घ्यायचे, यावर आपण भाष्य करणार नसून हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआयने २०२० मधील मालवणी पोलिस ठाण्यातील नोंदी आणि पुरावे मागविल्याची माहिती आपल्याला असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी आणि प्रकरण न्यायालयासमोर आल्यानंतरच कोण काय आहे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे आपण स्वतःहून कोणावर आरोप करणे योग्य ठरणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. (Nilesh Rane)



उबाठा गट कोकणवासीयांना अगरबत्तीही देणार नाही


- ठाकरेंकडून सोडण्यात आलेल्या बसच्या उद्घाटनावेळी राज्यगीताचा अपमान झाल्याच्या प्रश्नावर निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर टीका केली. दोघेही अजून राजकारण समजून घेण्याच्या वयात असल्याचे सांगत, ‘ठाकरे’ आडनाव असल्यामुळे काहीही करता येते आणि कोणाचाही अपमान करता येतो, असा समज असल्याची टीका त्यांनी केली. आपले वय आणि समोरच्या नेत्यांचे वय याचे भान ठेवणे आवश्यक आहे. पराभव झाल्यानंतरही ते जमिनीवर आलेले नाहीत, अशी टीकाही राणे यांनी केली.
- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेकडून मोफत रेल्वे आणि बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचवेळी दुसऱ्या शिवसेनेकडून (उबाठा गट) अशी कोणतीही सुविधा पुरवली जात नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ‘‘ते अगरबत्ती पण देणार नाहीत. तिथे फक्त इनकमिंग आहे, आउटगोइंग नाही,’’ असा टोला त्यांनी लगावला.
- चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा सरकारने ३५०हून अधिक अतिरिक्त गाड्या सोडल्या असल्याचे राणे यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे जवळपास एक लाख कोकणवासी बस आणि रेल्वेने प्रवास करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तिकिटांच्या काळाबाजाराबाबत यापूर्वीच तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

BRICS Summit : मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचे लक्षवेधी हस्तांदोलन; बदलत्या जागतिक राजकारणाचे संकेत

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे

Jalgaon Ganeshotsav : स्थापनेआधीच बाप्पाचं विसर्जन! ४७ हजारांची १२ फुटी गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; कार्यकर्त्यांचा मूर्तिकारावर आरोप

जळगाव : गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूरहून जळगावकडे आणली जात असलेली तब्बल १२ फूट उंचीची गणेशमूर्ती

Indian Weightlifter : आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का! राष्ट्रकुल रौप्यविजेता खेळाडू स्पर्धेबाहेर

नवी दिल्ली:

Mumbai Crime: बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन्...... कोटींचा फ्लॅट विकला; मुंबईत बायकोचा धक्कादायक कारनामा!

मुंबई: 'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं' ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल किंवा त्या म्हणीचा कोणाला बोलण्यासाठी सुद्धा

Junior Women's Asia Cup : दक्षिण कोरियाचा ५-१ ने धुव्वा उडवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल

मोकी, चीन:

Indoor News : इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत ब्युटीशियनचा संशयास्पद मृत्यू; ४० मिनिटे सोबत असणारा 'तो' व्यक्ती कोण ?

इंदोर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indoor News) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित हॉटेलमधील