मुंबई: रविवारी अर्थात उद्या घराबाहेर पडण्याआधी एकदा ही आवश्य बातमी वाचा. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला ...
हा संपूर्ण प्रकार, मुंबईतल्या बोरिवली परिसरामध्ये घडलेला आहे. एका खासगी कार्यालयामध्ये नोकरीला असणाऱ्या रायन क्रास्टा नावाच्या व्यक्तीसोबत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. रायनने २०१६ साली बोरिवलीतील एल.एम.रोडवरील 'राज व्हिला को. ऑपरेटिव्ह हौ. सो. लि'मध्ये ७३.८० लाखाला १ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट रायन आणि त्याची पत्नी शालिनी डायना क्रास्टा ह्या दोघांच्याही एकत्रित नावावर होता. ह्या फ्लॅटसाठी रायन आणि शालिनीने ५६ लाखांचं होम लोन घेतलं होतं. दोघांनीही एकत्रित रूमचं लोन सुद्धा फेडलं. पण कालांतराने त्यांच्यामध्ये काही कारणामुळे कौटुंबिक वाद झाला आणि त्यामुळे ते दोघंही वेगळे राहू लागले.
दरम्यान, मे २०२६ मध्ये हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. रायनचा मित्र प्रसाद पाताडे याने त्याला, त्याचा बोरिवलीतला फ्लॅट एका खाजगी बँकेकडे गहाण ठेवण्यात आल्याची माहिती दिली. धर्मेश जगदीश तन्ना आणि त्यांची पत्नी धारा धर्मेश तन्ना यांना १.११ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचे त्यांना समजले. त्यानंतर रायन आणि त्याच्या आईने खाजगी बँकेशी संपर्क साधला असता, शालिनीने ११ एप्रिल २०२५ रोजी एका नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे तो फ्लॅट धर्मेश तन्ना यांना विकल्याची धक्कादायक माहिती समजली. शालिनीने रायनचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र आणि इतरत्र खोटी कागदपत्रे तयार करून मालमत्ता विकली होती.
मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी लोढा फाउंडेशनच्या वतीने यंदाही ...
या संपूर्ण प्रकरणामुळे रायन आणि त्यांच्या आईची पायाखालची जमिनच सरकली. फ्लॅट विकण्यासाठी शालिनीने रायनचे मृत्यू प्रमाणपत्राव्यतिरिक्त, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) ते सुद्धा बनावट होते. इतकंच नाही तर, शालिनीने रायनची कायदेशीर वारसदार असल्याचं खोटं प्रतिज्ञापत्र सुद्धा बनवून घेतलं होतं. रायनने सोसायटीचे अध्यक्ष गौतम पुरोहित, सचिव पूजा पाताडे आणि खजिनदार एस. पाटील यांच्याकडे सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)ची चौकशी केली असता, अशी कोणतीही एनओसी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, त्या एनओसीवर असलेल्या स्वाक्षऱ्या सुद्धा खोट्या असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तयार करण्यासाठी शालिनीला कोणी मदत केली? याचा तपास पोलीस आता करत आहेत. प्राथमिक तपासानुसार, शालिनीने तन्ना कुटुंबाकडून फ्लॅटच्या मोबदल्यात १.११ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. ही रक्कम तिने कुठे गुंतवली? त्या १.११ कोटी रुपयांचा तिने कसा वापर केला? सह अशा अनेक प्रश्नांची उकल आता पोलिसांकडून केली जात आहे. शालिनीला बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून तिला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.