मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिसरात मोठा ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण सुमारे 9,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून 3,000 ते 4,000 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
AIIFA चे संचालक योगेश मंधानी यांनी सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाबाबत चर्चा केली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 0.5 MTPA क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी सुमारे 200 एकर जमीन आवश्यक आहे. या टप्प्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पाची क्षमता 1.2 MTPA पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यासाठी आणखी सुमारे 300 एकर जमीन लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास 500 एकर जमीन आवश्यक असेल. दोन्ही टप्प्यांचा विचार करता प्रकल्पातील एकूण गुंतवणूक सुमारे 9,500 कोटी रुपये असणार आहे.
पुणे : पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या ...
ग्रीन स्टीलच्या उत्पादनासाठी हरित वीज महत्त्वाची असल्याने कंपनीने प्रति युनिट 3 रुपये दराने हरित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रकल्पासोबतच Circular Economy Park उभारण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे स्टील प्रकल्पाबरोबरच त्याला पूरक औद्योगिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासल्यानंतर कंपनीकडून आवश्यक तांत्रिक माहिती आणि DPR म्हणजेच Detailed Project Report सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी पुढील आठवड्यात प्रस्तावित जमिनीची पाहणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत MIDC कडून समन्वय केला जाणार असून, त्यानंतर Letter of Intent देण्याची प्रक्रिया पुढे जाईल.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणि मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे उद्योगाभिमुख जिल्हे म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अशा प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






