Ganesh Chaturthi 2026 : गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी साहित्याची यादी; पूजा सुरू होण्याआधी या वस्तू घरी आणून ठेवा

Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणून विधीपूर्वक स्थापना केली जाते. बाप्पाच्या आगमनासाठी घराची सजावट, पूजा साहित्याची खरेदी, नैवेद्याची तयारी आणि पाहुण्यांना आमंत्रण देण्याची लगबग सुरू असते. ( Ganesh Chaturthi 2026 )


गणपतीची प्रतिष्ठापना करताना पूजेसाठी लागणारे एखादे साहित्य राहून जाऊ नये, यासाठी आधीच सर्व वस्तूंची यादी तयार करून ठेवणे फायदेशीर ठरते. पूजेसाठी चौरंग किंवा पाट, त्यावर अंथरण्यासाठी स्वच्छ वस्त्र आणि घराच्या प्रवेशद्वारासाठी रांगोळी आवश्यक आहे.



पूजेसाठी निरांजन, समई, उदबत्ती, धूप, कापूर, कापसाच्या वाती आणि आरतीचे ताट तयार ठेवावे. तसेच कलश, पाणी आणि आंब्याची पानेही लागतात. सुपारी, नारळ, विड्याची पाने, सुकं खोबरं, गूळ आणि दक्षिणेसाठी सुट्टे पैसे ठेवावेत. गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी दुर्वांच्या 21 जुड्या आणि लाल जास्वंदाची फुले आणावीत.


मूर्तीच्या पूजेसाठी जानवे, कापसाचे वस्त्र, अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता आवश्यक असतात. अभिषेकासाठी पंचामृत तयार करावे. यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर लागते. यासोबत शुद्ध पाणी किंवा गंगाजल, पळी-पंचपात्र, ताम्हण आणि पूजेची थाळी तयार ठेवावी. ( Ganpati Puja essentials)


नैवेद्यासाठी गणपती बाप्पाला मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यासोबत फळे, गूळ-खोबरे आणि इतर सात्त्विक पदार्थ ठेवता येतात. आरतीसाठी निरांजन किंवा समई, वाती, कापूर, उदबत्ती आणि काडेपेटी जवळ ठेवावी. अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आणि आरतीचे पुस्तकही पूजेच्या वेळी उपयोगी पडते.


पूजेचे साहित्य घरच्या परंपरेनुसार थोडेफार वेगळे असू शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबात वर्षानुवर्षे पाळल्या जाणाऱ्या पद्धतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. गणपती बाप्पाच्या स्थापनेपूर्वी सर्व साहित्य एकदा तपासून घेतल्यास पूजेच्या वेळी धावपळ होणार नाही. ( Ganesh Chaturthi Puja)


Comments
Add Comment

Hanuman Ansh Oscar: 'हनुमान अंश'ची थोडक्यात ऑस्करवारी मुकली, निर्मात्यांनी सर्व काही सांगितलं

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' चित्रपटाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान चर्चा सुरू आहे.

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाची चिंता मिटली, मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहोत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या

Pune Traffic Update: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तीन दिवसांसाठी

Neena Gupta: वयाच्या 67 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नेंट? संतापलेवल्या अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं

मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता ह्या बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. रोखठोक व्यक्तिमत्व आणि स्पष्ट बोलणं

Hartalika Teej 2026 : हरतालिका तृतीया पूजा साहित्य: घरातच पूजनाची तयारी करताय? 'या' वस्तू आणायला अजिबात विसरू नका!

हरतालिका तृतीया हा अखंड सौभाग्य आणि पतीच्या उदंड आयुष्यासाठी मानला जाणारा अत्यंत पवित्र

Mumbai Pune Expressway: जादुई नंबरप्लेट लावणं भोवलं, फॉर्च्यूनर ड्रायव्हरला RTO चा दणका

पिंपरी चिंचवड: अलीकडेच सोशल मीडियावर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टेक्नॉलॉजी वापरून आरटीओ पोलिसांच्या