Ahilyanagar News: कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दोन गायींची सुटका; पोलिसांची धडक कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेप्ती नाका कल्याण रोड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अमानुषपणे व दाटीवाटीने नेण्यात येणाऱ्या दोन जर्सी गायींची सुटका केली आहे.

अहिल्यानगर: तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेप्ती नाका कल्याण रोड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अमानुषपणे व दाटीवाटीने नेण्यात येणाऱ्या दोन जर्सी गायींची सुटका केली आहे. रात्रीच्या सुमारास डायल 112 या आपत्कालीन यंत्रणेवर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.



मिळालेल्या माहितीनुसार, नेप्ती नाका येथे एका पिकअप वाहनातून जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची गोपनिय माहिती आपत्कालीन यंत्रणेला प्राप्त झाली होती. या माहितीची त्वरित दखल घेत तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी एका पिकअप वाहनामध्ये दोन जर्शी गायी अत्यंत दाटीवाटीने, उपाशीपोटी आणि विनाअन्न-पाण्याचे क्रूरपणे डांबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.



पोलिसांनी घटनास्थळावरून रज्जाक इब्राहिम पठाण (रा. पिंपळाचा मळा, ता. राहुरी) आणि पिकअप चालक नीलेश मनोहर बेल्हेकर (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीची एक आणि 30 हजार रुपये किमतीची दुसरी अशा एकूण 80 हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायी, तसेच 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



पोलिसांनी आरोपींकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना व वैध कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे आढळली नाहीत. या प्रकरणी पोलिस नाईक महेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जनावरे वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Comments
Add Comment

आदिवासी बांधवांसाठी सरकारचा मोठा दिलासा! 14 शासन निर्णय जारी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने काढलेल्या संविधान हक्क संघर्ष मोर्चाच्या

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांची शक्यता

Maharashtra Weather News: राज्यात एकीकडे ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत असताना दुसरीकडे पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची

Tribal Community : आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सरकारचा मोठा निर्णय; वनहक्क दाव्यांसाठी 15 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

Maharashtra News: आदिवासी समाजाच्या शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार कार्ड आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न

Maharashtra Farmers : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रिम मदत; पीक कर्जाबाबतही मोठा निर्णय घेण्याचे संकेत

Maharashtra News: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये, अखर्चित निधीचा अहवाल तयार करण्याचे दिले निर्देश

मुंबई: राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आणि पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शहरांना मिळालेल्या निधीचा शहरनिहाय

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ससून गोदीतील महिला मच्छीमारांना मिळणार सुरक्षा किट

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध ससून गोदी येथील महिला मच्छीमार भगिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने