- मंत्री नितेश राणे यांचा घणाघात; शिवरायांचे मावळे हिंदू सणांमध्ये कधीही अडचणी आणणार नाहीत
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच लागू करण्यात आलेल्या धर्मस्वातंत्र्य कायद्याच्या घटनात्मक वैधतेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले काहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. "लव्ह जिहादविरोधात सरकारने केलेल्या कायद्याला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानात जावे. अशा लोकांना हिंदू राष्ट्रात स्थान नाही", असे राणे म्हणाले. तसेच, आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार असला तरी हिंदू सणांच्या काळात आंदोलन करून अडचणी निर्माण करू नयेत, असे आवाहनही त्यांनी मनोज जरांगे यांना केले.
धर्मस्वातंत्र्य कायद्याच्या घटनात्मक वैधतेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मौलाना हलिमउल्ला फारूक अहमद खान यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी, लव्ह जिहादविरोधात सरकारने केलेल्या या कायद्याला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानचे दरवाजे दाखवायला हवेत, असे म्हटले. अशा लोकांना हिंदू राष्ट्रात स्थान नसल्याचे सांगत त्यांनी त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्लाही दिला.
रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. राजापूर ...
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. याबाबत विचारले असता राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. इस्लामी आक्रमकांकडून हिंदूंची मंदिरे आणि धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली जात असल्याने त्याला रोखण्यासाठी शिवरायांनी स्वराज्य उभे केले. शिवरायांच्या नावाने समाजात वावरणाऱ्या त्यांच्या मावळ्यांनी हिंदूंच्या सणांमध्ये कधीही विघ्न आणू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आंदोलन करणे हा प्रत्येकाचा लोकशाही अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनाबाबत आवाहन केले आहे. मात्र, हिंदू सणांच्या काळात आंदोलन करून नागरिकांना अडचणीत आणू नये, असे राणे म्हणाले. गेल्या वर्षीही गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करण्यात आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे शिवरायांचे मावळे म्हणून स्वतःला मानणाऱ्यांनी या बाबीचा विचार करावा आणि हिंदूंच्या सणांमध्ये विघ्न आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.
दिशा सालियान प्रकरणावर काय म्हणाले नितेश राणे?
दिशा सालियान यांच्या वडिलांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याची माहिती असल्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, सीबीआयची चौकशी सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दिशा सालियान यांच्या वडिलांचा जबाब नोंदवून त्याआधारे एफआयआर घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता पुढील टप्प्यांमध्ये काय होते, ते पाहावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.