US Ambassador Sergio Gor : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर; दर्शन घेत म्हणाले, "येथील ऊर्जा आणि उत्साह अद्भुत!"

मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) मंडपाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. सर्जिओ गोर यांनी लालबागच्या राजाच्या दरबारात उपस्थित राहणे हा आपला मोठा सन्मान असल्याचे सांगितले. येथील भक्तीमय आणि चैतन्यमयी वातावरणाने ते भारावून गेले होते. "जगात अशी फार कमी ठिकाणे आहेत जिथे असा अद्भूत उत्साह पाहायला मिळतो," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्यांनी हा अनुभव घेतला नाही, त्यांनी आयुष्यात एकदा तरी लालबागच्या राजाच्या दर्शनाला नक्की यावे, असे आवाहनही त्यांनी केले. "येथील ऊर्जा आणि वातावरण शब्दात सांगणे कठीण आहे. मला इथे आमंत्रित केले गेले, हा माझा बहुमान समजतो. प्रत्येकाने इथे येऊन या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे," असे गोर म्हणाले.



उत्साहात गणेशोत्सव साजरा


सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यात १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक आपल्या घरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये लाडक्या गणरायाचे स्वागत करत आहेत. मुंबई हे गणेशोत्सवाचे मुख्य केंद्र मानले जाते. 'गणपती बाप्पा मोरया'च्या (Ganpati Bappa Morya) जयघोषात दरवर्षी हजारो-लाखो भाविक लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात. लालबागचा राजा ही केवळ एक गणेशमूर्ती नसून, ती मुंबईकरांची अखंड श्रद्धा, कलात्मकता आणि उत्सवप्रियतेचे प्रतीक मानली जाते.



लालबागच्या राजाचा गौरवशाली इतिहास


पुतळाबाई चाळ येथे स्थित 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' ही मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. या मंडळाची स्थापना १९३४ मध्ये झाली असून, तेव्हापासून हा गणेशोत्सव मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून 'कांबळी कुटुंब' अत्यंत श्रद्धेने आणि परंपरेने लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचे काम करत आहे.



विघ्नहर्त्याचा जयजयकार


भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला सुरू होणारा हा गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला संपन्न होतो. गणेशोत्सवाचा हा सण श्री गणेशाला 'नवीन सुरुवातीची देवता', 'विघ्नहर्ता' आणि 'बुद्धीची देवता' म्हणून सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो.

Comments
Add Comment

Police Rescue : विरारमध्ये पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ; आर्थिक विवंचनेतून चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचे वाचले प्राण

विरार: आर्थिक विवंचना, कौटुंबिक तण

Parag Shah : ३,३८३ कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेले भाजप आमदार पराग शाह घाटकोपरमध्ये झाले एका दिवसासाठी 'भिकारी'; नेमका प्रयोग कशासाठी?

मुंबई:

Amit Shah Ganpati Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

Radhika Ambani dance : एंटीलियात बाप्पाचा शाही थाट! राधिकाच्या मनमोहक नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई : गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील अंबानी कुटुंबाच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी यंदाही

Animal Cruelty Case : चेंबूरमधील मांजर हत्या प्रकरणात आरोपीला २४ तासांत जामीन; प्राणीप्रेमी संतप्त, कठोर कारवाईची मागणी

मुंबई : चेंबूरच्या पांजरापोळ परिसरात अनेक भटक्या मांजरांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडवून दिल्यानंतर अटक

Malad Ganpati : मालाडच्या कांचपाड्यात गणपतीची मूर्ती कोसळल्याचा दावा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच मुंबईतील मालाडच्या कांचपाडा परिसरातील गणपतीच्या मूर्तीचा एक व्हिडिओ