Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि शहरामध्ये गणेशभक्तांकडून दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबई आणि शहरामध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत २७१ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाला मंगळवारी दुपारपासून सुरुवात झाली आहे. या आकड्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीड दिवसांचे सार्वजनिक मंडळांच्या ११ गणेश मुर्ती, घरगुती गणेश मुर्ती २६० आणि हरतालिकेच्या ८ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे. गणेशमुर्ती विसर्जनासाठी महानगर पालिकेकडून प्रत्येक वॉर्डामध्ये कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. आपल्या सोयीप्रमाणे गणेश मुर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन बीएमसीकडून नागरिकांना करण्यात आले आहे. प्राप्त झालेला हा आकडा दुपारी ३ वाजेपर्यंतचा आहे. यामध्ये वेळेप्रमाणे आणखीन वाढ होईल.



दरम्यान, जे गणेशभक्त मुंबईमध्ये नैसर्गिक ठिकाणी गणेशमुर्तीचे विसर्जन करणार आहेत, त्यांच्यासाठीही नियमावली देण्यात आली. अरबी समुद्राला येणारी भरती आणि ओहटी बघूनच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन बीएमसीने गणेशोत्सव मंडळांना केले आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर समुद्रामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येते. ओहोटीच्या वेळी लहान गणेश मूर्तीचे विसर्जन करणे सोयीचे असते. मात्र मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्राला भरती असताना करणे आवश्यक आहे. पण समुद्राला मोठे उधाण असताना गणेश विसर्जन करणे धोक्याचे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे विसर्जनासाठी भरती आणि ओहोटीच्या वेळा प्रत्येक गणेशभक्तांना माहित असणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

Thane Metro: ठाणे मेट्रो केव्हापासून सुरू होणार? परिवहन मंत्र्यांनी सर्व काही सांगून दिलं...

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट

Lalbaugcha Raja Update : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी मीडियाची कोंडी! अधिकृत पास असूनही पोलिसांनी अडवल्याने पत्रकार आक्रमक

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2026) दरवर्षी लाखो

US Ambassador Sergio Gor : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर; दर्शन घेत म्हणाले, "येथील ऊर्जा आणि उत्साह अद्भुत!"

मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील

Police Rescue : विरारमध्ये पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ; आर्थिक विवंचनेतून चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचे वाचले प्राण

विरार: आर्थिक विवंचना, कौटुंबिक तण

Parag Shah : ३,३८३ कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेले भाजप आमदार पराग शाह घाटकोपरमध्ये झाले एका दिवसासाठी 'भिकारी'; नेमका प्रयोग कशासाठी?

मुंबई:

Amit Shah Ganpati Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती