Rajpal Yadav : राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; २ कोटी भरण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत, पासपोर्ट मात्र जमा

‘आम्हाला आशा आहे, तुम्ही इथे अभिनय करत नाही’! राजपाल यादवच्या केसवर CJI सूर्यकांतांची मिश्कील टिप्पणी


मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राजपाल यादवच्या वतीने उपस्थित वरिष्ठ वकिलांनी न्यायालयाकडे आणखी एक संधी देण्याची विनंती केली. तसेच, अभिनेत्याने किमान २ कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शवत त्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. (Rajpal Yadav)


राजपाल यादवच्या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतिम संधी देत दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. मात्र, न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आत्मसमर्पण करण्यापासून मिळालेली सूट ५ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Rajpal Yadav)




CJI सूर्यकांत यांची महत्त्वाची टिप्पणी


सुनावणीदरम्यान राजपाल यादवच्या वकिलांनी, “मी किमान दोन कोटी रुपये नक्कीच जमा करेन. मला दोन आठवड्यांसाठी अंतिम संधी दिली जावी,” अशी विनंती केली.


यावर सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी राजपाल यादवच्या यापूर्वीच्या वर्तनाचा उल्लेख केला. “ते बॉलिवूडमध्ये अभिनेते आहेत. आम्हाला आशा आहे की ते इथेही अभिनय करत नाहीत,” अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच, यापूर्वीच्या वर्तनामुळे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास अडचण असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. (Rajpal Yadav)


न्यायालयाने आदेशाचे पालन करण्यासाठी दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिली असून, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाईल, असे स्पष्ट केले. (Rajpal Yadav)




२०१० पासून सुरू आहे चेक बाऊन्स प्रकरण


हे प्रकरण २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित आहे. ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’सोबत झालेल्या व्यवहारातील सात वेगवेगळ्या चेक बाऊन्सनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. चित्रपट निर्मितीसाठी राजपाल यादव आणि त्यांची पत्नी राधा यादव यांनी संबंधित कंपनीसोबत आर्थिक व्यवहार केला होता. (Rajpal Yadav)


या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याच प्रकरणामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये राजपाल यादव यांना तिहार तुरुंगातही जावे लागले होते.


आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन आठवड्यांच्या मुदतीत राजपाल यादव २ कोटी रुपये जमा करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rajpal Yadav)


Comments
Add Comment

Hanuman Ansh : २ कोटींच्या बजेटमध्ये बनला, कमावले तब्बल २८० कोटी! ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर चमत्कारी कामगिरी; सुबोध भावेचा बायोपिक ठरला फ्लॉप?

मुंबई : नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवत सर्वांचे

SRK Reacts on Dhurandhar : किंग खानही झाला ‘धुरंधर’चा फॅन! म्हणाला, 'मी या चित्रपटाचे...'

मुंबई : रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ या सिनेमाने २०२५ आणि २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा निर्माण केली. दमदार

Bigg Boss 20 : दुसऱ्या आठवड्यात तीन स्पर्धक नॉमिनेट ? कोणाच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार ?

Bigg Boss 20 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सिझन 20 मध्ये पहिल्याच आठवड्यापासून ड्रामा, वाद आणि

Kiran Gaikwad New Movie : ‘देवमाणूस’चा खतरनाक व्हिलन आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत; किरण गायकवाडच्या ‘F.I.R. NO. 469’चं पोस्टर लाँच

मुंबई : ‘किरण गायकवाड’ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ‘देवमाणूस’ मालिकेतील खतरनाक व्हिलन.

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं; पती राज निदिमोरूच्या 'त्या' कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले

Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती

Bigg Boss Telugu 10: हिंदी सोडा, बिग बॉस तेलुगुमध्ये 'या' स्पर्धकाचीच चर्चा; एका एपिसोडसाठी घेतोय लाखोंचं मानधन

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे.