Nashik : अरे देवा... चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट, परदेशी क्रमांकावरून थेट....

Nashik : सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता सर्वसामान्य नागरिकच नाही तर कलाकार, उद्योगपती यासंह सरकारी अधिकाऱ्यांनाही आता हे सायबर भामटे लक्ष करत आहे. याचाच प्रत्यय आता नाशिकमध्ये आला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Nashik Collector Ayush Prasad) यांच्या नावाने चक्क बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Nashik Cyber Crime)



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार थायलंडमधील +66 92 455 6074 या क्रमांकाचा वापर करून हे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आले आहे. संबंधित अकाउंटवर व्यावसायिक खाते (Business Account) असे दर्शविण्यात येत आहे. या अकाउंटवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Nashik Collector Ayush Prasad)  यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यात आले असून, त्यांच्या पदाचा गैरवापर करून परदेशी क्रमांकावरून थेट नागरिकांना संदेश पाठवला जात असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे नाशिकसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा संशयास्पद संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Cyber Crime)



Hello... Where are you at the moment ?


या बनावट अकाउंटवरून “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या संदेशांद्वारे संबंधित व्यक्तींशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) उद्देशाने केला जात आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, या अकाउंटमागे नेमका कोणाचा हात आहे आणि संपर्क साधण्यामागील उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Nashik Cyber Crime)



नागरिकांना आवाहन


दरम्यान, नागरिकांनी या क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना अथवा दूरध्वनीला प्रतिसाद देऊ नये. तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे खाते अधिकृत नसून, संशयास्पद संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये. अशा प्रकारचा संपर्क आढळल्यास संबंधित यंत्रणेला तत्काळ माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचेही व्हॉट्सॲप अकाउंट सायबर भामट्यांकडून लक्ष केले गेल्याने खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

US Ambassador Sergio Gor : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर; दर्शन घेत म्हणाले, "येथील ऊर्जा आणि उत्साह अद्भुत!"

मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील

Nashik : नाशिकमध्ये मोदकांच्या २५ व्हरायटी, गोल्डन मोदकांनी वेधले लक्ष; किलोचा दर तब्बल २७ हजार रुपये

Nashik : गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले असून, गणरायाच्या नैवेद्यासाठी मोदक आणि

Gold Silver Price Today : ऐन सणासुदीत सोन्याचे भाव घसरले, सोन्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन सणासुदीत सोन्याचे भाव घसरले असल्याने

PCB Major Changes : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल होणार; आकिब जावेद आणि वहाब रियाझ यांना पदावरून हटवण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेटमधील ढासळलेला स्तर आणि सातत्यपूर्ण अपयशाची मालिका रोखण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर

Jalgoan Crime News : एकीकडे बापाच्या आगमनाचा उत्साह, दुसरीकडे खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंबियांना बसला धक्का ! खोलीत...

Jalgoan Crime News : घरोघरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. दरम्यान गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारीत असलेल्या एका