Lucknow Crime News : तरुणीला कारची धडक, बोनेटवर लटकवत नेलं अन्..., व्हिडीओ व्हायरल

Lucknow Crime News : देशभरात हिट अँड रनच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला कारची धडक दिल्यानंतर चालकाने कार न थांबवता तिला काही अंतरापर्यंत बोनेटवर लटकवत नेल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.



पार्कजवळ भेट अन् वादाला सुरुवात


पोलिसांच्या माहितीनुसार, कार चालक शहनवाज आणि तरुणी अनामिका हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. बुधवारी सकाळी अनामिका एका पार्कजवळ चहा पिण्यासाठी गेली होती. याचवेळी शहनवाजही तेथे एका अन्य तरुणीसोबत पोहोचला. शहनवाजला पाहताच अनामिकाने त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये वाद झाला. दोघेही यापूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनामिकाने शहनवाजवर आपली ओळख लपवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला. त्याची खरी ओळख समजल्यानंतर तिने त्याला जाब विचारला आणि यावरून दोघांमध्ये वाद वाढला. यानंतर शहनवाजने कारमधून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.



कार अडवण्यासाठी तरुणी पुढे आली


शहनवाज कार घेऊन निघत असताना अनामिकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती कारसमोर उभी राहिली. मात्र चालकाने कार थांबवण्याऐवजी ती पुढे नेल्याचा आरोप आहे. यावेळी अनामिका कारच्या बोनेटवर लटकली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती कारच्या बोनेटवर असल्याचे आणि मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसत आहे. काही अंतर गेल्यानंतर अनामिका कारवरून खाली पडली. मात्र कार चालकाने वाहन न थांबवता तेथून निघून गेल्याचा आरोप आहे.



तरुणी जखमी; पोलिसांकडून तपास सुरू


कारवरून खाली पडल्याने अनामिका जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या दुखापतीची नेमकी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर व्हायरल व्हिडीओच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी शहनवाजला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे. दोघांमध्ये नेमका वाद कशावरून झाला आणि त्यानंतर कार चालकाने वाहन का थांबवलं नाही, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने लखनऊमधील या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

India Russia relations : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ रशियाच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होणार

नवी दिल्ली: भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक बळकट करण्याच्या

India's First Dengue Vaccine : डेंग्यूचा धोका होणार कमी? भारताची स्वदेशी ‘DengiAll’ लस २०२७ मध्ये येण्याची शक्यता

मुंबई : पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि प्लेटलेट्स

India Pakistan : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र निषेध

नवी दिल्ली : उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय नौदल आणि पाकिस्तान नौदलाच्या जहाजांमध्ये

Bihar Flood News : बिहारमध्ये 50 लाख लोक पुराच्या विळख्यात, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

Bihar Flood News : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमधील १५

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स

BRICS Family Photo : ब्रिक्सच्या ‘फॅमिली फोटो’त मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकत्र; नवी दिल्लीतील छायाचित्राने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

नवी दिल्ली: १८व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या एका छायाचित्राने