शेअर बाजाराचा 'टर्निंग पॉईंट'! एका बातमीने बाजारातील मरगळ झटकली, नेमकं काय घडलं?

गेल्या काही महिन्यात शेअर बाजारात प्रचंड मंदीचं वातावरण होतं. या वर्षी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधून जवळपास 2.94 लाख कोटीची विक्री केल्यामुळे बाजारात घसरण होत आहे. पण एका बातमीने उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची एका दिवसात चांदी झाली. कारण सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी महत्त्वाचा ठरला. कारण या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने 1233 अंकांची उसळी घेतली आणि हे चित्र बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालं. शेअर बाजार दिवसाचा शेवटी 75692.78 अंकांवर बंद झाला. या अचानक आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जागतिक सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत कंपन्यांच्या चांगल्या निकालामुळे बाजारात तेजी आल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं असलं तरी एका बातमीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, सेबीने सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात सेबीने विदेशी गुंतवणूकदारांवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर पूर्णपणे रद्द करण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारी महिन्यात आगामी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.या आधी हा प्रस्ताव आल्याने गुंतवणूकदारांनी ही जमेची बाजू असल्याचं सांगितलं आहे. पण सेबीने फक्त प्रस्ताव पाठवला असून त्यावर काय निर्णय होतो? हे देखील महत्त्वाचं आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढल्याने दबाव


गेल्या काही वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून विक्रमी पैसे काढू घेतले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढत गेला. विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात अंदाजे 2.94 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आणि पैसे काढून घेतले. त्यामुळे बाजारात मोठी घसरण होत गेली. विदेशी गुंतवणूकदारांसोबत सेबीने अनेक बैठका घेतल्या. या बैठकीत गुंतवणूकदारांनी भारताची सध्याची करप्रणाली सोपी आणि उदार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे.



सध्याच्या नियमानुसार, एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या शेअर्सवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5 टक्क्यांनी कर आकारला जातो. अल्पकालीन भांडवली नफ्यावर 20 टक्के कर आहे. या शिवाय सिक्युरिटीज ट्रान्जेक्शन टॅक्स आणि डिविडेंडवरही विदहोल्डिग करही द्यावा लागत आहे. त्यामुळे सरकारने सेबीने दिलेला प्रस्ताव मान्य केला तर भारतीय शेअर बाजाराला एक संजीवनी मिळेल. आता येत्या अर्थसंकल्पात काय होते? याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागून आहे.

turning point for the stock market A single piece of news shook off the markets lethargy what exactly happened
Comments
Add Comment

झुनझुनू हादरले! रस्त्याचे काम करताना 11 हजार K.V. च्या विजेच्या तारेला मशीन अडकल्याने 8 मजुरांचा जागीच मृत्यू

राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. छापोली

Amit Shah : "राहुल बाबा, परदेशात फिरून निवडणुका नाही जिंकता येत; देशात येऊन घाम गाळावा लागतो!" अमित शाह यांची राहुल गांधींवर टीका

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी हैदराबादमध्ये भाजपच्या 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ'

Amit Shah Hyderabad Rally : राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 'अराजकते'विरोधात हैदराबादमध्ये अमित शाह यांचा धडक मोर्चा; भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

हैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून देशातील संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे व

Mumbai Bengaluru Vande Bharat Express: CCTV, लॉक दरवाजे अन् स्वच्छ टॉयलेट! ट्रॅव्हल क्रिएटरने सांगितला अनुभव

नवीन बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस केवळ तिच्या वेग आणि आधुनिक रुपामुळेच नाही तर इतरही कारणांमुळे

Delhi NCR Firecrackers : दिवाळीत दिल्लीकरांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाकडून 'ग्रीन फटाके' फोडण्यास परवानगी; वेळ आणि कडक नियमावली जाहीर

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (Delhi-NCR) वाढणारे हवेचे प्रदूषण

SWAYAM July 2026 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! स्वयं परीक्षेची नोंदणी मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत आजच करा अर्ज

SWAYAM July 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स (स्वयम्) जुलै सत्र