भिवंडी : बुधवारी पहाटे भिवंडीच्या खंडुपडा परिसरातील उमर अपार्टमेंटच्या तळघरातील पार्किंगमध्ये एका भीषण आगीची दुर्दैवी घटना घडली. या आगीत तब्बल १४ दुचाकी जळून खाक झाल्या असून, इमारतीमध्ये धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली आणि सुरक्षेसाठी त्यांना इमारतीच्या गच्चीवर धाव घ्यावी लागली.(Bhiwandi Fire)
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ही आग पहाटे पावणेचार ते चारच्या दरम्यान लागली. आगीच्या तीव्र ज्वाळांनी संपूर्ण पार्किंग परिसर वेढला होता. आग नियंत्रणात आल्यानंतर पाहणी केली असता, १४ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, शॉर्ट सर्किट हे आगीचे प्राथमिक आणि संभाव्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.(Bhiwandi Fire)
Nashik Shalarth Scam : नाशिकमधील तब्बल १६० कोटी रुपयांच्या शालार्थ घोटाळ्याप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि मुख्य संशयित नितीन मुरलीधर उपासनी ...
रहिवाशांचा थरारक अनुभव
उमर अपार्टमेंटमध्ये एकूण २५ च्या आसपास फ्लॅट्स आहेत. पहाटेच्या सुमारास अचानक इमारतीत धूर भरू लागल्याने नागरिकांची झोपमोड झाली.
अबुलैस शेख (स्थानिक रहिवासी): "मी पहाटे ४ च्या सुमारास जागा झालो आणि काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. दरवाजा उघडला तेव्हा सर्वत्र धूर होता. त्यानंतर खिडकीतून बाहेर पाहून मी माझ्या मुलांसह गच्चीवर आश्रय घेतला," असे त्यांनी सांगितले.
नसीम अन्सारी (स्थानिक रहिवासी): "मी पहाटे साडेतीनच्या सुमारास माझे वाहन पार्क करून वर गेलो होतो, आणि काही वेळातच इमारतीत धूर येऊ लागला. जेव्हा आम्ही तिसऱ्या मजल्यावर खाली उतरलो, तेव्हा काही महिलांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आम्ही त्यांना त्वरित गच्चीवर नेले," अशी माहिती त्यांनी दिली.
Kanpur Crime News : कानपूरमधील प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मनोचा (६०) यांच्या हत्येच्या तपासात दररोज नवे धागेदोरे समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात विनीत ...
एक महिला रुग्णालयात दाखल
या दुर्घटनेत श्वास घेण्याचा त्रास झालेल्या एका महिलेला उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, अग्निशामक दलाने आणि नागरिकांच्या मदतीने आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले असून मोठी जीवितहानी टळली आहे. सध्या पोलीस आगीच्या नेमक्या कारणाचा सखोल तपास करत असून जखमींविषयी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.(Bhiwandi Fire)