PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचं रहस्य काय ? डाएटबाबत पंतप्रधानांनीच सांगितल्या खास गोष्टी

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76वा वाढदिवस आहे. वय वाढत असताना फिटनेस आणि ऊर्जा टिकवून ठेवणं अनेकांसाठी आव्हान ठरतं. मात्र, पंतप्रधान मोदी आपल्या व्यस्त वेळापत्रकातही सक्रिय राहतात. या वयातही मोदी फिट आणि एनर्जेटिक आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेस आणि आहाराबाबत अनेकदा चर्चा होत असते. मोदी स्वतः काय खातात आणि फिटनेससाठी कोणत्या सवयी पाळतात? याबाबत त्यांनी ‘परीक्षा पे चर्चा 2026’ मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माहिती दिली होती.



माझी कोणतीही ठरावीक डाएट नाही


फिटनेस आणि डाएटबाबत प्रश्न विचारला असता मोदींनी सांगितलं की, त्यांची कोणतीही ठरावीक डाएट सिस्टिम नाही. आयुष्यात मला कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या काळात विविध कुटुंबांसोबत राहण्याचा योग आला. त्यामुळे तिथे जे जेवण मिळायचं तेच करायचो. एवढं मात्र नक्की की, मी शाकाहारी आहे. फक्त शाकाहारीच भोजन घेतो, असं मोदींनी सांगितलं होतं. कधी स्वतः स्वयंपाक करण्याची वेळ आली तर साधी खिचडीही बनवत असल्याचं त्यांनी सांगितलं.



डाएट औषधासारखी नको


डाएट ही जबरदस्तीने पाळायची गोष्ट नसून ती जीवनशैलीचा भाग असावी, असं मोदींनी सांगितलं. एखादा आहार औषधाप्रमाणे केवळ मजबुरीने घेतला तर तो दीर्घकाळ टिकवणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे आपल्या शरीराला आणि आवडीला योग्य असा आहार निवडण्यावर त्यांनी भर दिला. मोदींनी खाण्याच्या सवयींवरही भर दिला आहे. प्रत्येकाने एक गोष्ट ठरवली पाहिजे. ती म्हणजे तुम्हाला पोट भरून खायचंय की मन भरून? तुम्ही ही गोष्ट एकदा ठरवली तर सर्व गोष्टी सोप्या होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बहुतेक लोकं तर त्यांना कोणी टोकत नाही, तोपर्यंत खातच राहतात. लोक अन्न पदार्थ पोटभरून खातात, पण शरीराच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करतात, असंही ते म्हणाले होते.



जेवणाइतकंच श्वास घेणंही महत्त्वाचं


मोदींनी आरोग्याच्या संदर्भात दीर्घ श्वास घेण्यावरही भर दिला. दिवसभरात जेव्हा संधी मिळेल तेव्हा खोलवर श्वास घेण्याचा सराव करावा आणि त्यानंतर हळूहळू श्वास सोडावा, असं त्यांनी सांगितलं. परीक्षा पे चर्चा 2026 मध्येही त्यांनी दिवसातून किमान एकदा श्वसनाचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी विद्यार्थ्यांना सूर्योदय पाहण्याची सवय लावण्याचाही सल्ला दिला. त्यांच्या मते, सकाळची सुरुवात अशा सवयीने केल्याने शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. यापूर्वी परीक्षा पे चर्चा 2025मध्येही त्यांनी सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवण्यास आणि सूर्योदयानंतर खोल श्वास घेण्यास सांगितलं होतं.



आरोग्याला द्या पहिलं प्राधान्य


धावपळीच्या जीवनात अनेकजण काम, जबाबदाऱ्या आणि तणावाला प्राधान्य देतात आणि आरोग्य मागे पडतं. मात्र, शरीर निरोगी असेल तरच इतर जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडता येतात, असा संदेश मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. म्हणूनच त्यांच्या सांगण्यानुसार फिटनेससाठी एखादा ‘जादुई डाएट प्लॅन’ नसून संतुलित आहार, स्वतःच्या शरीराची काळजी, श्वसनाचा सराव आणि आरोग्याला प्राधान्य देण्याच्या सवयी महत्त्वाच्या आहेत.

Comments
Add Comment

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी

Terrorist Encounter : उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत 2 दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरू

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच आहे. उधमपूर जिल्ह्यातील एका

Lucknow Crime News : तरुणीला कारची धडक, बोनेटवर लटकवत नेलं अन्..., व्हिडीओ व्हायरल

Lucknow Crime News : देशभरात हिट अँड रनच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून

India Russia relations : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ रशियाच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होणार

नवी दिल्ली: भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक बळकट करण्याच्या

India's First Dengue Vaccine : डेंग्यूचा धोका होणार कमी? भारताची स्वदेशी ‘DengiAll’ लस २०२७ मध्ये येण्याची शक्यता

मुंबई : पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि प्लेटलेट्स