पुणे: महाराष्ट्रामध्ये अन्न- औषध प्रशासनाचे अधिकारी सध्या सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीनिमित्त हॉटेल- रेस्टॉरंट चालक, डेअरी चालक आणि मिठाई दुकानदार यांच्याकडून ग्राहकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न रोखण्यासाठी सध्या एफडीएकडून शक्य तिथे छापा मारून ग्राहकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह अशा प्रमुख शहरांमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून अस्वच्छता दिसत असेल, त्या ठिकाणी कारवाई केली जात आहे.
Pune Traffic News: पुणेकरांनो, गणपती दर्शनासाठी जाताय? ‘या’ ६ रस्त्यांवर पार्किंगला बंदी!
पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणेकरांना वाहतूकीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये गणपती ...
अशातच, पुण्यातील 'द न्यू पुना क्लब'च्या स्वयंपाकघरामध्ये अस्वच्छता असल्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचं दिसताच एफडीएकडून क्लबचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएकडून करण्यात आलेल्या तपासणीत जिथे अन्न शिजवले जाते त्या परिसरामध्ये आणि अन्नाची साठवणूक केली जाते त्या कपाटामध्ये, जिवंत झुरळ, किटकांची रांग, स्वयंपाकघरामध्ये उंदराची विष्ठा पाहायला मिळाली. इतकंच नाही तर, स्वयंपाकघरामध्ये अनेक ठिकाणी सांडपाणी साचलेले, किचनच्या भिंती- ओट्यावर तेलाचा थर आणि किचनमध्येच अस्वच्छ शौचालय हे सर्व पाहून अधिकारीही चक्रावले.
Pune Hadapsar Railway : पुणे रेल्वे प्रवासाचे गणित बदलणार! १५ दिवस मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द तर २५ गाड्यांचे मार्ग बदलणार
हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
पुणे : हडपसर ते घोरपडीदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला आता वेग आला ...
क्लबमध्ये, अन्नसुरक्षा कायद्यातील ‘शेड्यूल 4’ मधील मूलभूत नियमांचं उल्लंघन येथे होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच तात्काळ परवाना निलंबणाचा निर्णय घेतला. ग्राहकांच्या जीवाशी कुठलीही तमा न बाळगता खेळत असल्याचं पाहता अधिकाऱ्यांनी कुठलीही सवलत न देता परवाना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. उच्चभ्रू परिसरामध्ये असलेल्या क्लबमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात किळसवाण्या पद्धतीने जेवण बनवले जात असल्याचे पाहून सर्वच अचंबित झाले आहेत. या क्लबमध्ये अनेक
&pp=ygUQUHJhaGFhciBOZXdzbGluZdIHCQkkDAGHKiGM7w%3D%3D">हाय प्रोफाईल लोकं दररोज जेवणासाठी येतात. ग्राहकांच्या आरोग्याशी अशा पद्धतीने खेळ सुरू असल्याचा प्रकार धडक कारवाईमुळे समोर आला आहे. पुण्यातील इतर परिसरामध्ये मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, तेल, बेकरी पदार्थ आणि इतरत्र पदार्थांची तपासणी करण्यात आली.
फुड पॅकेट्सवर ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आढळल्यावर, भेसळ असल्याचं जाणवल्यास आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे. अनेक दुकानदारांचे परवाना निलंबित करत काहींना दुकानातील सामानाचा दर्जा सुधारण्याचाही सल्ला दिला.