मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शुक्रवारी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय क्रिकेटच्या प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या या बैठकीत अरुण सिंह धुमल आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची IPL गव्हर्निंग कौन्सिलवर निवड, २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी, पंच व मॅच रेफरींच्या वेतनरचनेत वाढ, वय पडताळणी धोरणात बदल तसेच २०२८ मधील बीसीसीआयच्या शताब्दी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यास मंजुरी देण्यात आली. (BCCI AGM)
IPL गव्हर्निंग कौन्सिलमध्ये धुमल-मजुमदार
AGM मधील प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे IPL गव्हर्निंग कौन्सिलसाठी दोन प्रतिनिधींची निवड. अरुण सिंह धुमल आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची जनरल बॉडीचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. दोघांनाही या पदासाठी पुन्हा संधी मिळाली असून, IPLच्या प्रशासनात त्यांची भूमिका कायम राहणार आहे. (BCCI AGM)
जपानमधील नागोया येथे होणाऱ्या 'आशियाई खेळ २०२६' च्या (Asian Games 2026) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजधारक म्हणून डबल ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर ...
२०२५-२६ चे हिशेब आणि २०२६-२७ च्या बजेटला मंजुरी
बैठकीत बीसीसीआयच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षित हिशेबपत्रकाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अर्थसंकल्पालाही जनरल बॉडीने मंजुरी दिली. आगामी आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. (BCCI AGM)
IPLच्या २०व्या हंगामाचं भव्य सेलिब्रेशन
२०२७ मध्ये होणारा IPLचा २०वा हंगाम मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय जनरल बॉडीने एकमताने घेतला आहे. त्यामुळे IPLच्या दोन दशकांच्या प्रवासाचा विशेष सोहळा आयोजित केला जाणार आहे.
२०२८ मध्ये BCCIचा शताब्दी सोहळा
BCCIच्या स्थापनेला २०२८ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शताब्दी सोहळ्याच्या तयारीची प्रक्रिया सुरू करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा सोहळा डिसेंबर २०२७पासून सुरू होऊन २०२८मध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याची योजना आहे. (BCCI AGM)
मियामी: फुटबॉल विश्वाचा महानायक आणि महान खेळाडू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या नावावर एका विक्रमी टप्प्याची नोंद केली आहे. नू स्टेडियमवर ...
पंच आणि मॅच रेफरींच्या वेतनात वाढ
देशांतर्गत क्रिकेटमधील अंपायर आणि मॅच रेफरींसाठी वाढीव वेतनरचनेला सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. यासोबतच त्यांच्या श्रेणींचे पुनर्वर्गीकरणही करण्यात आले आहे.
लैंगिक छळ प्रतिबंधक धोरणासाठी नवी समिती
BCCIच्या लैंगिक छळ प्रतिबंधक (Prevention of Sexual Harassment) धोरणांतर्गत नवीन अंतर्गत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (BCCI AGM)
वय पडताळणी धोरणात बदल
क्रिकेटपटूंच्या वयाशी संबंधित पडताळणी प्रक्रिया अधिक अद्ययावत करण्यासाठी बीसीसीआयचे वयो-पडताळणी धोरण (BCCI Age Verification Policy) अपडेट करून स्वीकारण्यात आले.
दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी विशेष सुविधा
राज्य क्रिकेट संघटनांच्या सहकार्याने दिव्यांग क्रिकेटपटूंना आवश्यक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यांच्या विकासाला आणि प्रगतीला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. (BCCI AGM)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वादळी फलंदाजी करत ...
१० प्रमुख निर्णयांचा थोडक्यात आढावा
- अरुण सिंह धुमल आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची IPL गव्हर्निंग कौन्सिलवर निवड.२०२५-२६ चे लेखापरीक्षित हिशेबपत्रक मंजूर.
- २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी.
- २०२६-२७ साठी लेखापरीक्षकांची नियुक्ती.
- २०२७ मधील IPLच्या २०व्या हंगामाचे भव्य सेलिब्रेशन करण्याचा निर्णय.
- BCCIच्या २०२८ मधील शताब्दी सोहळ्याची तयारी सुरू.
- पंच आणि मॅच रेफरींच्या वेतनरचनेत वाढ व श्रेणींचे पुनर्वर्गीकरण.
- लैंगिक छळ प्रतिबंधक धोरणांतर्गत नवीन अंतर्गत समिती.
- अद्ययावत वय पडताळणी धोरण स्वीकारले.
- दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी सुविधा आणि संसाधनांबाबत राज्य संघटनांसोबत उपाययोजनांवर चर्चा.
महत्त्वाची नोंद : AGMनंतर BCCIच्या पदाधिकाऱ्यांना पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आल्याचेही वृत्त आहे; मात्र BCCIच्या अधिकृत १० निर्णयांच्या प्रसिद्धीपत्रकात हा मुद्दा समाविष्ट केलेला नाही. (BCCI AGM)





