Nashik FDA Action : सणासुदीत भेसळीविरोधात FDA ची धडक मोहीम ! 36 कारवायांत 5.40 कोटींचा मुद्देमाल जप्त

Nashik FDA Action : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असतानाच भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे या चार जिल्ह्यांत गेल्या १० दिवसांत करण्यात आलेल्या ३६ कारवायांमध्ये तब्बल ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अहिल्यानगरमधील कोल्ड स्टोरेजमधून जप्त करण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या बटरच्या मोठ्या साठ्याचाही समावेश आहे.



अहिल्यानगरमध्ये बटरचा साठा जप्त


सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहआयुक्त (अन्न), नाशिक मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील मे. अरिहंत कोल्ड स्टोरेज येथे कारवाई करण्यात आली. येथे साठवून ठेवलेला ७५ हजार ३५६.८ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये आहे. याशिवाय निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील मे. आर्या कोल्ड स्टोरेज ॲण्ड एक्सपोर्टस येथून कस्टर्ड ॲपल पल्प, आंबा पल्प आणि क्रीम असा ६,४५७ किलो साठा, ज्याची किंमत ३९ लाख १८ हजार ५२० रुपये आहे, जप्त करण्यात आला.



नाशिकमध्ये बर्फीचा साठा जप्त


नाशिकच्या द्वारका परिसरात ११ सप्टेंबर रोजी पहाटे दोन खासगी बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमधून तब्बल २,१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फी आढळून आली. या साठ्याची किंमत ५ लाख ५८ हजार २६७ रुपये असून तो जप्त करण्यात आला. याशिवाय नाशिकमध्ये विजया एंटरप्रायजेस येथून २९८.४ किलो इंटर एस्टरिफाइड व्हेज फॅट, प्रकाश एंटरप्रायजेस, पंचवटी येथून ७४७.९ किलो सोयाबीन तेल, तसेच अंबालाल हिरालाल पटेल आणि श्री महावीर सुपर मार्केट येथेही विविध अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली.



जळगाव, धुळ्यातही मिठाईवर कारवाई


जळगावमध्ये न्यू वाघ मिल्क डेअरी, पाचोरा येथून ५९३.४ किलो क्रीम व तूप जप्त करण्यात आले. याची किंमत ३ लाख ४० हजार ९५२ रुपये आहे. तसेच स्वीट सुपारी आणि हलवा-बर्फीच्या साठ्यावरही कारवाई करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील गायत्री ट्रेडर्स येथून गाय आणि म्हशीचे मिळून ४६३.४ किलो तूप जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३ लाख १ हजार रुपये आहे. अहिल्यानगरमध्ये रुचीराज स्वीट्स येथून ३०० किलो तूप, श्रीरामपूर येथील हिरालाल नंदलाल नवलखा यांच्याकडून २३० किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले.



नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार


सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत