Pune Crime News : शिरूरमध्ये भल्या पहाटे गोळीबाराचा थरार, तरुणाचा जागीच मृत्यू ; परिसरात खळबळ

Pune Crime News : शिरूर शहरात शुक्रवारी भल्या पहाटे गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालीय. लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



गोळीबाराचा आवाज अन्...


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरी गंगावणे असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास लाटेआळी परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता हरी गंगावणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. गोळ्या लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.



घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाची पाहणी


घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहेत.


हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला आहे का किंवा त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस (Shirur Police) करत आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने