Rajpal Yadav Cheque Bounce Case : ‘कोर्टात अभिनय करू नका’....ही शेवटची संधी म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादवांना सुनावलं

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणी अद्याप कायम आहेत. चेक बाऊन्स आणि कर्जाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला असला, तरी सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. न्यायालयाने 2 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करण्यासाठी राजपाल यादव यांना आणखी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.



‘कोर्टात अभिनय करू नका’


सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी राजपाल यादव यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. राजपाल यादव हे चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनेता असले तरी न्यायालयात मात्र अभिनय करण्याची अपेक्षा नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना सुनावलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. राजपाल यादव यांच्या मागील न्यायालयीन इतिहासाचा संदर्भ देत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना ही शेवटची संधी असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ते देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



नेमकं काय आहे प्रकरण?


हे प्रकरण ‘मुर्ली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’शी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव यांनी ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं. हे कर्ज ‘मुर्ली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’चे माधव गोपाल अग्रवाल यांच्याकडून घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. मात्र, चित्रपटाला अपेक्षित यश न मिळाल्याने राजपाल यादव यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने आणि दिलेले चेक बाऊन्स झाल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. व्याज आणि दंडासह थकीत रक्कम कालांतराने सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं या प्रकरणात सांगण्यात आलं आहे.



उच्च न्यायालयाने सुनावली होती शिक्षा


या प्रकरणात राजपाल यादव यांना यापूर्वी तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी कर्जाची रक्कम परत करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने प्रकरण पुढे गेलं. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना दोषी ठरवत प्रत्येक खटल्यासाठी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नी राधा यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत या प्रकरणात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र

Mumbai Filmcity News: फिल्मसिटीमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण

मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये फिल्म सिटी अर्थात चित्रनगरी आहे. या चित्रनगरीमध्ये मराठीसह हिंदी भाषेतील

Maharashtrachi Hasyajtra News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचं अपघाती निधन, टीमवर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं जातं. या शोचे फक्त

Censor Board : सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना; प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठींसह 18 नव्या सदस्यांचा समावेश

मुंबई :  केंद्र सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ची पुनर्रचना केली आहे. नव्या मंडळात

The One Movie : ४०० वर्षांचं गूढ अन् जंगलातील रहस्य; सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या आगामी ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या बहुप्रतीक्षित

Dadasaheb Phalke Award : सिनेविश्वातील मोठा सन्मान! ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय चित्रपट