Nashik : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धा : ४२ गणेश मंडळांचा सहभाग, आता देखाव्यांची प्रत्यक्ष पाहणी

Nashik : सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७च्या जनजागृतीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४२ मंडळांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परीषदेत दिली.


प्राप्त अर्जांच्या आधारे आता सहभागी गणेश मंडळांच्या देखाव्यांची व विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यासाठी नऊ सदस्यीय तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे समितीचे अध्यक्ष, तर उपजिल्हाधिकारी योगेश चंद्रे सदस्य सचिव आहेत. समितीकडून सिंहस्थ महाकुंभ संकल्पनेशी सुसंगतता, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग, अंमलबजावणीची गुणवत्ता व शाश्वतता या निकषांवर मूल्यमापन केले जाणार आहे. गणेशोत्सवातील लोकसहभागाच्या माध्यमातून सिंहस्थ महाकुंभचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, पर्यावरणपूरक व शाश्वत कुंभ, तंत्रज्ञानाचा वापर आणि भाविकसेवा याबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे सिंह यांनी सांगितले.



पाच प्रवर्गांत प्रत्येकी एक लाखांचे पारितोषिक


स्पर्धेतील पाच प्रमुख प्रवर्गांमध्ये प्रत्येकी विजेत्या मंडळाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच नावीन्यपूर्ण व विशेष संकल्पनेसाठी दोन लाख रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे यासाठी नोंदणीची मुदत १० सप्टेंबरवरून १७ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती.



५५० कोटी रुपयांचा निधी वितरित


रिंगरोडच्या सात पॅकेजची कामे सुरू झाली असून, प्राधिकरणामार्फत सुमारे ५५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे नियोजन असल्याचे . साधुग्रामच्या जागेसंदर्भात शेतकरी अधिग्रहण व भाडेपट्टीबाबत असलेल्या गैरसमजांवर चर्चा सुरू असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Comments
Add Comment

Radha Ashtami : सुख, शांती आणि समृद्धीसाठी राधा अष्टमीची पूजा कशी करावी? वाचा टप्प्याटप्प्याने संपूर्ण विधी

राधाष्टमीनिमित्त बरसाणामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी वृषभानू नंदिनी राधाराणी यांची जयंती

Nashik Ashram School News : आश्रमशाळेची दुरवस्था पाहून मंत्री संतप्त, मान्यता रद्द करण्याच्या सूचना

Nashik Ashram School News : आश्रमशाळांमधील सुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर