शाहरूख- दीपिकाचा King कमाईमध्ये 'किंग' ठरला; ओटीटी, म्युझिक अन् सॅटेलाईट राईट्समध्ये कमावले कोट्यवधी

शाहरूख खानच्या 'किंग' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ओटीटी, म्युझिक अन् सॅटेलाईट राईट्स विकून कोट्यवधींची कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

मुंबई: सिद्धार्थ आनंद, शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा 2023 साली 'पठाण' चित्रपट रिलीज झाला होता. आता तब्बल तीन वर्षांनंतर, हे तिघंही 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख खानच्या 'किंग' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटाची रिलीज डेट निर्मात्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर शाहरूख खानच्या वाढदिवशी चित्रपटातील 'तू मिल जाए' गाणं रिलीज झालं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला बरेच दिवस असताना, सोशल मीडियावर चित्रपटाच्या कमाईबद्दल कमाईची चर्चा होत आहे. चित्रपटाने रिलीजच्या आधीच छप्परफाड कमाई केलीये.



सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, 'किंग' चित्रपट 24 डिसेंबर 2026 ला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. शाहरूख खानचा हा अपकमिंग मोस्ट अवेटेड चित्रपटाचा बजेटच 350 करोड ते 450 करोड पर्यंतचा आहे. मेगाबजेट चित्रपट असणाऱ्या ह्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पूर्वीच जबरदस्त कमाई केलेली आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आनंद यांच्या 'किंग' चित्रपटाने रिलीजच्या पूर्वीच 665 कोटींची जबरदस्त कमाई केलेली आहे. शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणचा 'किंग' चित्रपट मार्फिलिक्स आणि रेड चिलिज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ओटीटी राईट्स, म्युझिक राईट्स आणि सॅटेलाईट राईट्सच्या माध्यमातून कमाई केलेली आहे.



400 कोटींच्या मेगा बजेट चित्रपटामध्ये सिद्धार्थ आनंद यांची फी सुद्धा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किंग खानने 'किंग' चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे. त्यामध्ये चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचा खर्च पकडलेला नाही. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे एकंदरित बजेट 540 ते 560 कोटी रूपयांच्या आसपास आहे. हा आकडा पाहता सर्वाधिक महागड्या चित्रपटांच्या यादीमध्ये किंग खानच्या 'किंग' चित्रपटाचा समावेश होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा फॅन क्लब फक्त भारतातच नाहीतर, जगभरामध्येही मोठ्या प्रमाणावर आहे. 'किंग' चित्रपटाने परदेशी बाजारपेठेत आतापर्यंतचा सर्वात मोठा हमी करार केल्याची इंडस्ट्रीमध्ये आहे, एवढी मोठा करार करणारा 'किंग' पहिला बॉलिवूड चित्रपट आहे.


 


चित्रपटाच्या परदेशी वितरणाचे हक्क 175 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. फार्स फिल्म्सने चित्रपटाचे परदेशी वितरण हक्क विकत घेतली आहे. भारतामध्ये, पेन मरुधर कंपनीने 250 कोटी रुपयांची ॲडव्हान्स डील करत थिएट्रीकल राईट्स विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या डिजिटल हक्कांसाठीही मोठा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने 'किंग'चे ओटीटी स्ट्रीमिंग राईट्स 150 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तर, सॅटेलाइट राईट्स 25 कोटी रुपये आणि म्युझिक राईट्स 65 कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती आहे. मात्र, नेटफ्लिक्ससोबत झालेल्या करारात एक महत्त्वाची अट असल्याचंही सांगितलं जात आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईप्रमाणे स्ट्रीमिंग राईट्सची रक्कम वाढू किंवा कमी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनानंतर या करारातील अंतिम आकडे बदलण्याची शक्यता आहे.



दरम्यान, डिस्ट्रिब्युशन, ओटीटी, सॅटेलाईट आणि म्युझिक राईट्सचा झालेला व्यवहार पाहता, 'किंग' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी 665 कोटी रूपयांची कमाई केलेली आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार हे आकडे आहेत. याची अधिकृत माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी दिलेली नाही. शाहरूखसाठी 'किंग' चित्रपट खास असेल. या चित्रपटातून तो त्याची लेक सुहाना खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटामध्ये, दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच मोठ्या करारांमुळे चर्चेत आलेल्या 'किंग'कडून आता बॉक्स ऑफिसवर किती कमाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Aishwarya Shete: ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये ऐश्वर्या शेटेचा एलिगंट लूक

[caption id="attachment_1072170" align="aligncenter" width="800"] मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाला कोट्यवधींच्या खंडणीची धमकी! लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. टायगर श्रॉफ नंतर आता आणखी एका

Bigg Boss 20: ‘मला पैसेसुद्धा नकोत!’ माही विजचा संताप, बिग बॉस २० मधून घेणार एक्झिट?

बिग बॉस २० या टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सध्या नातेसंबंध आणि एकमेकांबद्दलची वक्तव्ये या दोन्ही बाबतीत मोठा drama

Adinath Kothare Movie: सेटवर पाऊल ठेवणं म्हणजे, मंदिरात प्रवेश करण्यासारखं...आदिनाथ कोठारेचं रामायण चित्रपटामधील आठवणी

Adinath Kothare Ramayana Movie: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie)

'दृश्यम 3' ने ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या इतर सर्व बॉलिवूड चित्रपटांना टाकलं मागे; कमाईची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क

ऑक्टोबर २०२६ चा महिना बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांमध्ये

Salman Khan New Song controversy: 'तेरी सेक्सी ब्यूटी' या सलमानच्या नव्या गाण्याने चाहते संभ्रमात;  युद्धपटात रोमँटिक गाणं का?

Salman Khan New Song controversy: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांनी त्यांच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi) या