‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर!
मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची धडपड आणि त्या नात्यातील भावनिक गुंतागुंत आता ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले पुन्हा एकदा बाप-लेकीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘दे धक्का 2’नंतर ही जोडी पुन्हा एकत्र येत असून, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘दशमी’ ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Dashmi Marathi Movie)
काय आहे ‘दशमी’ची कथा?
चित्रपटात मकरंद अनासपुरे प्रभाकर, तर गौरी इंगवले लक्ष्मीची भूमिका साकारत आहेत. स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून मुलगी लक्ष्मीने डॉक्टर व्हावं, यासाठी प्रभाकर आयुष्यभर कष्ट करतो. वडिलांच्या या त्यागाची जाणीव असलेली लक्ष्मीही त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न स्वतःचं मानून पुढे जाणारी मेडिकल स्टुडंट आहे.
मुलीच्या प्रत्येक स्वप्नामागे खंबीरपणे उभा राहणारा पिता आणि वडिलांच्या प्रेमात आपलं संपूर्ण विश्व पाहणारी मुलगी, असा या दोघांचा भावनिक प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. (Dashmi Marathi Movie)
मुंबई: मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. २०२५ मध्ये रिलीज झालेला संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' चित्रपटाची (Gondhal Movie) ऑस्कर 2027च्या ...
मकरंद अनासपुरे काय म्हणाले?
प्रभाकरची व्यक्तिरेखा साकारताना वडिलांचं मुलीवरील प्रेम आणि तिच्यासाठीची धडपड अनुभवता आल्याचं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. मुलीसमोर खंबीर दिसत असतानाही आतून तुटणाऱ्या वडिलांची अवस्था साकारण्याचा अनुभव भावनिक असल्याचं त्यांनी नमूद केलं.(Dashmi Marathi Movie)
गौरी इंगवलेची भूमिका काय?
गौरी इंगवलेच्या मते, लक्ष्मी आणि तिच्या वडिलांचं नातं साधं असलं तरी मनाला भिडणारं आहे. तिच्या प्रत्येक स्वप्नामागे वडिलांचे कष्ट असल्याची जाणीव लक्ष्मीला आहे. त्यामुळे वडिलांबद्दलचं प्रेम, भावनिक जवळीक आणि आयुष्यातील संकटांनंतर बदलणारं तिचं विश्व साकारताना भावनिक अनुभव आल्याचं गौरीने सांगितलं.
Diler Kharkiya : हरियाणवी गायक आणि अभिनेता दिलेर खरकियाच्या रेंज रोव्हरवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. भिवानीतील त्याच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारला ...
पुन्हा एकदा बाप-लेकीची जोडी
‘दे धक्का 2’मध्ये बाप-लेकीची भूमिका साकारल्यानंतर मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले पुन्हा त्याच नात्याच्या वेगळ्या भावनिक छटांसह पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे ‘दशमी’मधील प्रभाकर-लक्ष्मीचं नातं प्रेक्षकांच्या मनाला किती भिडतं, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.




