Wednesday, November 4, 2026

Salman Khan New Song controversy: 'तेरी सेक्सी ब्यूटी' या सलमानच्या नव्या गाण्याने चाहते संभ्रमात;  युद्धपटात रोमँटिक गाणं का?

एका गंभीर आणि भावूक अशा देशभक्तीपर किंवा युद्धपटात अशा प्रकारच्या आधुनिक व फ्लर्टेशिअस (Flirty) प्रेमगीताचा समावेश केल्यामुळे त्याचे चाहते आणि नेटीझन्स प्रचंड संभ्रमात पडले आहेत.

Salman Khan New Song controversy: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांनी त्यांच्या आगामी 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Maatrubhumi) या युद्धपटातील 'तेरी सेक्सी ब्यूटी' (Teri Sexy Beauty) हे गाणे ४ नोव्हेंबर रोजी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक पहाटे 5:12 वाजता सोशल मीडियावर प्रदर्शित केले. तसेच त्याला एक मजेशीर कॅप्शन दिले. गाण्याच्या गीतांचा खोडकर संदर्भ देत, पहाटेच्या विमानाने प्रवास करण्याबद्दल शब्दखेळ केला. “पळण्याची वेळ पहाटे 5:12…. विमान वेळेवर, 2 पेग खाली, माझ्या सेक्सी ब्युटीसोबत टेक ऑफ… पता नहीं कहाँ मैं लँड करूँ,” असे सलमानने या कॅप्शनमध्ये लिहिले आणि #TeriSexyBeauty Out Now हा हॅशटॅग जोडला आहे. तसेच भाईजानने यूट्यूबवरील संपूर्ण गाण्याच्या लिंकसाठी चाहत्यांना त्याच्या इंस्टाग्राम बायोचा संदर्भ दिला आहे. परंतु, एका गंभीर आणि भावूक अशा देशभक्तीपर किंवा युद्धपटात अशा प्रकारच्या आधुनिक व फ्लर्टेशिअस (Flirty) प्रेमगीताचा समावेश केल्यामुळे त्याचे चाहते आणि नेटीझन्स प्रचंड संभ्रमात पडले आहेत.

अधिक लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गाणे प्रदर्शित करण्याच्या वेळा काळजीपूर्वक आधी ठरवल्या जातात आणि त्यावर चर्चा केली जाते. पण सलमान खानने याचा विचार केलेला दिसत नाही. अल्गोरिदमद्वारे मागोवा घेण्याच्या आणि मोहिमेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याच्या या युगात, गाण्यांच्या प्रकाशनासारख्या गोष्टी काळजीपूर्वक योजल्या जातात आणि त्यांची नियोजन करून आखणी केली जाते. परंतु, बुधवारी सकाळी, या बॉलिवूड सुपरस्टारने कोणतीही पूर्वसूचना न देता, सोशल मीडियावर आपल्या 'तेरी सेक्सी ब्युटी' या नवीन गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. जगभरातील अर्धे लोक जागे होण्यापूर्वीच, पहाटे 5  वाजता हे सर्व घडले.

सलमानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटातील या गाण्याचे संगीत हिमेश रेशमिया यांनी केले असून, ते सलमान खान आणि मुस्कान यांनी गायले आहे. या गाण्याचे संगीत साजिद खान यांनी केले असून, गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. सदर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन (Choreography) प्रसिद्ध कोरिओग्राफर सीझर गोन्साल्विस (Caesar Gonsalves) यांनी केले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये सलमानसोबत चित्रपटाची हिरोईन चित्रांगदा सिंग दिसत आहे .

 
View this post on Instagram
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

चाहत्यांची प्रतिक्रिया

‘मातृभूमी’ यासारख्या दुःखद युद्धपटात हे आधुनिक, बेधडक गाणे कसे काय बसते, याबद्दल अनेक चाहते गोंधळले होते. तसेच आश्चर्यचकितही झाले होते. “मजेदार गाणे आहे, पण त्या चित्रपटात त्याचा काय उपयोग आहे?” असे एका चाहत्याने विचारले आहे. दरम्यान, गाणे पहाटे ५ वाजता रिलीज झाल्यामुळे “सलमानने हे चुकून पोस्ट केले की हा त्याचा स्वभावच आहे?” असे एका कमेंटमध्ये लिहिले आहे, “सलमान भाईची झोपण्याची वेळ माझ्या झोपेच्या वेळेसारखीच आहे.”, असेही एका चाहत्याने म्हंटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >