Chakan FDA gutkha raid news : चाकणमध्ये एफडीएची धडाकेबाज कारवाई; ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर १.१३ कोटींचा गुटखा जप्त!

बदलेला प्रवास मार्ग, चकवा देण्याचा प्रयत्न, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा ६ तासांचा थरारक पाठलाग आणि रात्रभर चाललेली कायदेशीर कारवाई... एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा थरारांनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चाकण येथे धडक कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणला जाणारा तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी एफडीएने केली आहे.



गुप्त बातमी आणि मार्गातील बदल


अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता या कारवाईला सुरुवात झाली. मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी व ठाण्याच्या दिशेने प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक येत असल्याची पक्की बातमी होती. मात्र, चालकाने भिवंडीचा नियोजित मार्ग बदलून ट्रक संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने वळवला.



अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा थरारक पाठलाग


गाडीने मार्ग बदलल्याचे समजताच एफडीएची पथके तात्काळ सतर्क झाली. ठाणे पथक मुरबाडकडे तर पुणे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी श्री. लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने ट्रक न थांबवता तसाच पुढे पळवला. यानंतर ६ तासांचा थरारक पाठलाग सुरू झाला. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौकात ट्रकला शिताफीने घेराव घालून रात्री ८ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.



जप्त केलेला मुद्देमाल



  • रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला: ₹२९,९५,२००/-

  • आर.एम.डी. पानमसाला: ₹२६,४०,०००/-

  • तानसेन सुगंधित पानमसाला: २४,९४,८००/-

  • तुळशी रॉयल जाफरानी जर्दा: ₹९,६०,०००/-

  • टी.ओ. प्रिमियम जर्दा: ₹२,६४,६००/-

  • ट्रक (क्र. MH 18 BZ 2350): ₹२०,००,०००/-

  • एकूण जप्त साठा: ₹१,१३,५४,६००/


५ जणांवर गुन्हा दाखल; रात्रभर चालली प्रक्रिया



जप्तीची कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया रात्रभर सुरू होती. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता चाकण उत्तर पोलीस ठाण्यात (पिंपरी चिंचवड) भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.



आरोपींची नावे


१. नफीस मेहबूब खान (वय ४०, रा. हरियाणा) – ट्रक चालक
२. निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा) – मालक/पुरवठादार
३. अरुण पाटील (रा. जळगाव) – मालक/पुरवठादार
४. मे. J.M.D. Enterprises (धुळे) – वाहन मालक
५. संजय माटा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) – वाहतूकदार



गुन्हेगारांवर 'मकोका' लावण्याची शिफारस


हा प्रकार केवळ अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन नसून सार्वजनिक आरोग्याशी खेळणारा संघटित गुन्हेगारीचा भाग आहे. त्यामुळे आरोपींची पूर्वपीठिका आणि आर्थिक व्यवहार तपासून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसांना देण्यात आला आहे.



प्रशासनाचा सज्जड इशारा 


महाराष्ट्रात अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणताही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहील."— तुकाराम मुंढे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य)



तक्रारीसाठी संपर्क साधा


अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर किंवा complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Pune News : पत्नीला खोटं सांगून प्रेयसीसोबत मलेशियाची ट्रिप; विमानतळावर पासपोर्टने केला घात, प्रेयसी अडकताच व्यापाऱ्याने रचली इमिग्रेशनची कहाणी, प्रकरण थेट पोलिसांत!

मुंबई : पत्नीला आपण व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जात असल्याचं सांगून प्रत्यक्षात महिला मैत्रिणीसोबत

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन

MHADA Pune Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय? म्हाडाच्या ४,४६२ घरांच्या सोडतीला मुदतवाढ; जाणून घ्या नवं वेळापत्रक

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परवडणाऱ्या घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली

Ramesh Pawar : मनात कलेचा ध्यास, हातात सर्जनशीलता अन् हृदयात श्रद्धा; रमेश पवारांच्या घरात साकारलं त्र्यंबकेश्वर मंदिर!

नाशिक : परिस्थिती कितीही साधी असली, तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि नवी कल्पना साकारण्याची इच्छा असेल, तर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर विभागातील ७ स्थानकांवर २०९ कोटींची अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा

मुंबई : भारतीय रेल्वेने सिग्नलिंग व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मध्य

Nitesh Rane : संजय राऊत जितके बोलतील, तितक्या लवकर आदित्य ठाकरेंना अटक होईल!

- मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीतील कथित खुनांची चौकशी का केली