MHADA Pune Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय? म्हाडाच्या ४,४६२ घरांच्या सोडतीला मुदतवाढ; जाणून घ्या नवं वेळापत्रक

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परवडणाऱ्या घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,४६२ सदनिकांच्या सोडतीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करताना अर्जदारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन म्हाडाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. (MHADA Pune Lottery)


आता या घरांसाठी ऑनलाइन अर्ज १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. तसेच, या घरांची बहुप्रतीक्षित सोडत आता २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.



अर्जदारांना मुदतवाढ का?


म्हाडाने २४ ऑगस्ट रोजी ४,४६२ सदनिकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आणि त्यांची पडताळणी करताना अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. (MHADA Pune Lottery)


अर्जदारांची गैरसोय होऊ नये आणि अधिकाधिक पात्र नागरिकांना अर्ज करता यावा, यासाठी म्हाडाने अर्जाची मुदत एक महिन्याने वाढवली आहे.



पुणे, पिंपरी-चिंचवड आणि PMRDAमध्ये ४,४६२ घरे


या सोडतीत पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील घरांचा समावेश आहे.


पुणे महापालिका क्षेत्र - १,४६८ सदनिका
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र - १,४०६ सदनिका
PMRDA क्षेत्र - १,५८८ सदनिका


यापैकी २,९७१ सदनिका २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, तर १,४९१ सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आहेत. याशिवाय मागील दोन सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या ५५८ सदनिकांचाही समावेश करण्यात आला आहे. (MHADA Pune Lottery)



आता असे असेल सुधारित वेळापत्रक


म्हाडाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, अर्जदारांनी पुढील तारखा लक्षात ठेवणे आवश्यक आहे:




  • ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत: १५ ऑक्टोबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

  • ऑनलाइन अनामत रक्कम (EMD): १५ ऑक्टोबर, रात्री ११:५९ पर्यंत

  • RTGS/NEFT द्वारे शुल्क भरण्याची अंतिम वेळ: १६ ऑक्टोबर, दुपारी ३ वाजेपर्यंत

  • स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी: १२ नोव्हेंबर, सायंकाळी ७ वाजता

  • दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत: १४ नोव्हेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

  • स्वीकृत अर्जांची अंतिम यादी: २० नोव्हेंबर, सायंकाळी ७ वाजता

  • म्हाडा सोडत: २६ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता

  • विजेत्यांची यादी: २६ नोव्हेंबर, सायंकाळी ६ वाजता



उत्पन्नाच्या कागदपत्रांबाबतही दिलासा


अर्जदारांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा देण्यात आली आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र (ITR) सादर करता येणार आहे.


त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA परिसरातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. (MHADA Pune Lottery)


Comments
Add Comment

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन

Ramesh Pawar : मनात कलेचा ध्यास, हातात सर्जनशीलता अन् हृदयात श्रद्धा; रमेश पवारांच्या घरात साकारलं त्र्यंबकेश्वर मंदिर!

नाशिक : परिस्थिती कितीही साधी असली, तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि नवी कल्पना साकारण्याची इच्छा असेल, तर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर विभागातील ७ स्थानकांवर २०९ कोटींची अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा

मुंबई : भारतीय रेल्वेने सिग्नलिंग व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मध्य

Chakan FDA gutkha raid news : चाकणमध्ये एफडीएची धडाकेबाज कारवाई; ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर १.१३ कोटींचा गुटखा जप्त!

बदलेला प्रवास मार्ग, चकवा देण्याचा प्रयत्न, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा ६ तासांचा थरारक पाठलाग आणि रात्रभर

Nitesh Rane : संजय राऊत जितके बोलतील, तितक्या लवकर आदित्य ठाकरेंना अटक होईल!

- मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीतील कथित खुनांची चौकशी का केली

Jalgaon : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन्... जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लालबागच्या