Nitesh Rane : "जेवढे तोंड उघडाल, तेवढा मालकाचा मुलगा..."; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई : विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांवर आणि राजकीय वक्तव्यांवर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अत्यंत तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाचे नेते रोज तेच तेच जुने आरोप करून केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा थेट दावा राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.



"सत्तेत असताना चौकशी का केली नाही ?"




गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्ष एकाच मुद्द्यावर जुनी टेप रेकॉर्डर वाजवल्यासारखे आरोप करत आहेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि सत्ता हातात असताना त्यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी का केली नाही ? चौकशी करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते ?" सत्ता हातात असताना काहीही करायचे नाही आणि आता रोज तीच तीच वक्तव्ये करून लोकांचा वेळ वाया घालवायचा, या प्रकाराला जनता आता पूर्णपणे वैतागली आहे, असेही ते पुढे म्हणाले.



"राजकारण न करता न्यायाला प्राधान्य द्या"


या संवेदनशील प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहण्याचे स्पष्ट आवाहन करत मंत्री नितेश राणे म्हणाले की, ही एका बापाची आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड आणि कायदेशीर लढाई आहे. सध्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे या विषयावर कोणत्याही राजकीय नेत्याने अनावश्यक वक्तव्ये करून राजकारण करू नये.



संजय राऊतांना 'मैत्रीपूर्ण सल्ला'


विरोधी नेत्यांना कडक इशारा देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "तुमचे नेते आणि संजय राऊत जेवढे तोंड उघडतील, तेवढा त्यांच्या मालकाचा मुलगा अधिक अडचणीत येत जाईल. तुम्ही जेवढे या विषयावर बोलाल, तेवढा पोलिसांना आदित्य ठाकरे यांची चौकशी आणि अटकेची कारवाई करण्याचा मार्ग अधिक मोकळा होईल." त्यामुळे संजय राऊत यांनी आता तरी गप्प राहावे आणि आपल्या मालकाच्या मुलाला सुरक्षित ठेवावे, असा 'मैत्रीपूर्ण सल्ला'ही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

Rohed Khan Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'रोहेद खान'चा पत्ता कट; ‘बिग बॉस २०’मध्ये पहिलं एलिमिनेशन

मुंबई : ‘बिग बॉस २०’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरातील स्पर्धकांमध्ये वाद, भांडणं आणि मनोरंजनाची रंगत पाहायला

Ranveer- Deepika 2nd Baby Girl: रणवीर- दीपिकाच्या घरी पुन्हा गौराईचं आगमन, बॉलिवूड कपल दुसऱ्यांदा झाले आई- बाबा

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. दीपिकाने एका

Chakan FDA gutkha raid news : चाकणमध्ये एफडीएची धडाकेबाज कारवाई; ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर १.१३ कोटींचा गुटखा जप्त!

बदलेला प्रवास मार्ग, चकवा देण्याचा प्रयत्न, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा ६ तासांचा थरारक पाठलाग आणि रात्रभर

Nitesh Rane : संजय राऊत जितके बोलतील, तितक्या लवकर आदित्य ठाकरेंना अटक होईल!

- मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीतील कथित खुनांची चौकशी का केली

Mumbai Metro Accident: मेट्रोच्या बांधकामावेळी विक्रोळीत आणखी एक बळी, लोखंडी बॅरिकेट अंगावर पडून एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील विक्रोळीमध्ये मेट्रोच्या कामावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीतील

Jalgaon : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन्... जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लालबागच्या