Rohed Khan Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'रोहेद खान'चा पत्ता कट; ‘बिग बॉस २०’मध्ये पहिलं एलिमिनेशन

मुंबई : ‘बिग बॉस २०’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरातील स्पर्धकांमध्ये वाद, भांडणं आणि मनोरंजनाची रंगत पाहायला मिळत आहे. आता शोमध्ये पहिलं एलिमिनेशनही पार पडलं आहे. दुसऱ्या आठवड्यात अभिनेता आणि मॉडेल रोहेद खान याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोहेदसोबत आसिफ खान आणि तन्मय सिंह उर्फ स्काउट ओपी हे देखील नॉमिनेशनमध्ये होते. (Rohed Khan Bigg Boss 20)



नियम मोडल्यामुळे तिघेही नॉमिनेट


घरातील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आसिफ खान, स्काउट ओपी आणि रोहेद खान यांना बेघर होण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या एलिमिनेशनमध्ये रोहेद खानला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे तो या सीझनमधून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. (Rohed Khan Bigg Boss 20)




सलमान खाननेही घेतली होती रोहेदच्या गेमची दखल


‘बिग बॉस २०’च्या घरात रोहेदची उपस्थिती इतर काही स्पर्धकांच्या तुलनेत फारशी प्रभावी दिसली नाही. टास्कमध्ये त्याचा सहभाग मर्यादित असल्याचं पाहायला मिळालं. तसेच घरातील दैनंदिन कामांमध्येही तो फारसा सक्रिय नसल्याचं दिसून आलं.


‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खाननेही रोहेदच्या गेमवर भाष्य केलं होतं. त्याचा खेळ प्रेक्षकांसमोर ठळकपणे दिसत नसल्याचं सलमानने त्याला सांगितलं होतं. त्यानंतर आता एलिमिनेशनमध्ये रोहेदला घराबाहेर जावं लागलं आहे. (Rohed Khan Bigg Boss 20)




कोण आहे रोहेद खान?


रोहेद खान हा ऑस्ट्रियन अभिनेता, मॉडेल आणि मार्शल आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो. २०२३ मध्ये कंगना राणौतच्या ‘तेजस’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने ‘सरकलम’ ही खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘बिग बॉस २०’च्या माध्यमातून तो हिंदी प्रेक्षकांसमोर अधिक चर्चेत आला. (Rohed Khan Bigg Boss 20)



१६ स्पर्धकांसह झाली होती सुरुवात


‘बिग बॉस २०’ची सुरुवात एकूण १६ स्पर्धकांसोबत झाली होती. यामध्ये मेरी कोम, माही विज, कनिका मान, आम्रपाली दुबे, ईशा रिक्खी, अरिश्फा खान, कुशल तंवर उर्फ गुल्लू, तन्मय सिंह उर्फ स्काउट ओपी, रॅपर यंग डीएसए, आसिफ खान, काजी तौकीर, अमन गांधी, उदिती सिंह, रीती तिवारी आणि लव गिल यांचा समावेश आहे.


रोहेद खानच्या एलिमिनेशननंतर आता घरातील उर्वरित स्पर्धकांमध्ये पुढील नॉमिनेशन आणि टास्कसाठी चुरस वाढणार आहे. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये कोणाचा गेम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Rohed Khan Bigg Boss 20)




















Comments
Add Comment

शाहरूख- दीपिकाचा King कमाईमध्ये 'किंग' ठरला; ओटीटी, म्युझिक अन् सॅटेलाईट राईट्समध्ये कमावले कोट्यवधी

मुंबई: सिद्धार्थ आनंद, शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा 2023 साली 'पठाण' चित्रपट रिलीज झाला होता. आता तब्बल तीन

Aishwarya Shete: ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये ऐश्वर्या शेटेचा एलिगंट लूक

[caption id="attachment_1072170" align="aligncenter" width="800"] मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाला कोट्यवधींच्या खंडणीची धमकी! लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा

Ayushmann Khurrana: बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. टायगर श्रॉफ नंतर आता आणखी एका

Bigg Boss 20: ‘मला पैसेसुद्धा नकोत!’ माही विजचा संताप, बिग बॉस २० मधून घेणार एक्झिट?

बिग बॉस २० या टीव्ही रिऍलिटी शोमध्ये सध्या नातेसंबंध आणि एकमेकांबद्दलची वक्तव्ये या दोन्ही बाबतीत मोठा drama

Adinath Kothare Movie: सेटवर पाऊल ठेवणं म्हणजे, मंदिरात प्रवेश करण्यासारखं...आदिनाथ कोठारेचं रामायण चित्रपटामधील आठवणी

Adinath Kothare Ramayana Movie: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie)

'दृश्यम 3' ने ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या इतर सर्व बॉलिवूड चित्रपटांना टाकलं मागे; कमाईची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क

ऑक्टोबर २०२६ चा महिना बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांमध्ये