Central Railway : मध्य रेल्वेची धडक कारवाई! १८.०३ लाख विनातिकीट प्रवाशांकडून १४० कोटींहून अधिकचा दंड वसूल



मुंबई : रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत झालेली वाढ आणि सखोल तपासणी मोहिमांमुळे चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने दंडात्मक वसुलीत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत मध्य रेल्वेने तब्बल १८.०३ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत १४०.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Railway Ticket Checking)



मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात मोठी वाढ


मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षी (एप्रिल ते ऑगस्ट २०२५) याच कालावधीत १७.१९ लाख प्रकरणांतून १००.५० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी प्रकरणांच्या संख्येत सुमारे ५% वाढ झाली असून, दंड वसुलीच्या उत्पन्नात तब्बल ४०% पेक्षा जास्त मोठी वाढ नोंदवली गेली आहे. या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेतर्फे दररोज सरासरी ११,००० पेक्षा अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ९२.०३ लाख रुपयांची वसुली केली जात आहे.(Central Railway)



विभागनिहाय दंड वसुली (एप्रिल ते ऑगस्ट २०२६):




  • मुंबई विभाग: ८.८० लाख प्रकरणे — ५८.४६ कोटी रुपये




  • भुसावळ विभाग: ३.४२ लाख प्रकरणे — ३५.५२ कोटी रुपये




  • नागपूर विभाग: २.११ लाख प्रकरणे — १५.८३ कोटी रुपये




  • पुणे विभाग: १.८६ लाख प्रकरणे — १६.२९ कोटी रुपये




  • सोलापूर विभाग: ०.९५ लाख प्रकरणे — ६.१३ कोटी रुपये




  • मुख्यालय: ०.८८ लाख प्रकरणे — ८.५७ कोटी रुपये





ऑगस्ट महिन्याची विशेष कामगिरी


फक्त ऑगस्ट २०२६ या एका महिन्यात मध्य रेल्वेने २.५७ लाख प्रवाशांना पकडून १९.५० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ही वसुली १३.७८ कोटी रुपये होती, म्हणजेच या एका महिन्यात दंड वसुलीत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.(Railway Ticket Checking)



कडक तपासणी आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण


विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आल्यापासून रेल्वे प्रशासनाने आपली पावले अधिक आक्रमक केली आहेत. मेल/एक्सप्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागांतील उपनगरीय लोकल्समध्ये 'फोर्ट्रेस' तपासणी (प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर कडक नजर), अचानक धाडी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे.(Railway Ticket Checking)


रेल्वे कायद्यानुसार वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा गुन्हा असून, यातून गोळा होणारा महसूल प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जातो. विनातिकीट प्रवासाबाबत मध्य रेल्वेचे धोरण 'झिरो टॉलरन्स' (शून्य सहिष्णुता) असून, प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट काढूनच सन्मानपूर्वक व जबाबदारीने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Short Circuit : लालबागच्या राजाच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किट; भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण   

Ganeshotsav Decoration: घरातच साकारलं बनारसचं गंगाघाट! सीवूड्समधील भावंडांची भन्नाट कलाकृती पाहून तुम्हीही थक्क व्हाल

नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वाधिक उत्सुकतेची गोष्ट असते ती

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोशी जोडणारा पहिला फ्लायओव्हर कधीपासून सुरू होणार?

मुंबई: मुंबईमध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक घट्ट केली जात आहे. मेट्रो कॉरिडॉरशी जोडलेला

Motilal Nagar Redevelopment News: म्हाडाचा मोठा निर्णय! मोतीलाल नगरचा कायापालट करण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

मुंबई: गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर १, २ आणि ३ या वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाराष्ट्र गृहनिर्माण

BMC Ganeshotsav initiative : श्रीगणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा, आठवणी आणि वारसा डिजिटल स्वरुपात जतन करणार; ‘Bappa.org’ उपक्रमात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील श्रीगणेशोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, धार्मिक प्रथा, कौटुंबिक आठवणी,

Lalbagcha Raja News: जबरदस्त,'प्रसाद ते उर्जा'; ‘लालबागच्या राजा’च्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार

मुंबई: मुंबईमध्ये अनेक प्रसिद्ध मंडळांकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे