Malabar Hill : मलबारहिल टेकडीवर नवीन ५२ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलाशय

प्रकल्प सल्लागाराचा प्रस्तावाची पुन्हा तपासणीसाठी आयआयटी रुरकीची घेतली मदत


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मलबार टेकडी जलाशय टाकीचे बांधकाम तोडून त्याठिकाणी नव्याने जलाशय उभारताना मोठयाप्रमाणात झाडे कापण्यात येत असल्याने याला मोठ्यास्तरावर विरोध झाला. त्यामुळे आता नवीन जागेत ५२ दशलक्ष क्षमतेचा तीन स्तरीय पर्यायी साठवण जलाशय तसेच व्हॉल्व्ह गॅलरीचे बांधकामाचा सुधारित प्रस्ताव बनवण्यात आला असून या प्रस्तावाचे पुनरावलोकनाच्या कामासाठी आयआयटी रूरकी या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. ज्यामुळे जमिनीखाली एक स्तर आणि जमिनीवर एक आणि त्यावर एक अशप्रकारे तीन स्तरांमध्ये हे जलाशय कमीत कमी झाडे कापून बांधले जाणार आहे. आयआयटी रुरकीने प्रकल्प सल्लागाराने बनवलेल्या प्रस्तावाचे पुनरावलोकन केल्यानंतर आता येथील जलाशयाच्या कामाला पुढील सर्व मंजुरीनंतर सुरुवात होईल.



फिरोजशाह मेहता गार्डन येथील मलबार टेकड़ी जलाशयाच्या पुनबौधणीचे काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. या कामात ३८० झाडे बाधित होत असल्याने त्याला होणारा स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी यांचा विरोध केला. हा विरोध लक्षात घेऊन बाधित झाडांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आयआयटी-रुरकी यांच्या माध्यमातून विविध पर्यायांची तपासणी करून मलबार हिल जलाशयाच्या पश्चिम बाजूस, कर्मचारी निवासस्थाने आणि पंपिंग स्टेशनच्या जागेवर ५२ दशलक्ष लिटर क्षमतेचा तीन-स्तरीय जलाशय बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय नवीन व्हॉल्व्ह गॅलरीचे बांधकाम करणे इत्यादी कामांचा आराखडा तथा प्रस्ताव प्रकल्प सल्लागा पेडणेकर अँड असोशिएट्स यांनी बनवले होते.


महानगरपालिकेच्या प्रचलित मार्गदर्शक धोरणानुसार तांत्रिकदृष्ट्‌या अवघड बांधकामाबाबत मुंबई महानगरपालिकेच्या यादीवरील सल्लागाराकडून प्राप्त झालेल्या संरचना, आराखडे व कार्यप‌द्धतीबाबत सी.जे.आय., एस.पी.सी.ई. किंवा भारतीय प्रौ‌द्योगिकी संस्था यांसारख्या संस्थांमधील स्वतंत्र तजांकडून पुनर्विलोकन करून घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने भारतीय प्रौ‌द्योगिकी संस्था-रुरकी यांची नियुक्ती करून प्रकल्प सल्लागार यांनी केलेल्या प्रस्तावाची पुनरावलोक करण्यात आले. यासाठी या संस्थेला २२ लाख रुपये एवढे सेवा शुल्क मोजण्यात आले आहे.


जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येथील जुन्या जलाशय तोडून नव्याने बांधण्यास विरोध झाल्यामुळे याच्या दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव प्रकल्प सल्लागाराने तयार केला आहे, त्याचे पुनरावलोकन करण्यासाठी आयआयटी रुरकी या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये सध्या ५२ दशलक्ष लिटर क्षमतेची जमिनीखाली एक स्तर आणि जमिनीवर दोन स्तर अशाप्रकारे तीन स्तरावर जलाशय उभारले जाणार आहे. यामुळे नवीन जलाशय बांधण्यासाठी ज्या ३८० झाडे कापण्याची गरज होती, त्याऐवजी केवळ ७० ते ८० झाडे कापण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे कमीत कमी झाडे कापून या जलाशयाची उभारणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

BMC : माय गे (मुंबई) तू चाल पुढे….

सचिन धानजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आश्विनी भिडे या जेव्हा विराजमान झाल्या तेव्हा, पहिल्या महिला आयुक्त

Deendayal Antyodaya Yojana : महिला बचत गटांना आता २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत स्थापित गटांना मिळणार लाभ मुंबई (विशेष

Mumbai News : बोरीवली पश्चिमेला मुर्दा गल्लीतील जिनाही बनणार सरकता

रेल्वे स्थानकासह स्कायवॉकही पादचारी पुलाला जोडणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): बोरीवली रेल्वे स्थानकासमोर गोरा

Mumbai Accident News : धक्कादायक! मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, 3 तरुणांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई : मुंबईत अपघातांची मालिका सुरुच आहे अशातच कोस्टलरोडवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कोस्टल

Maharashtra weather : राज्यात पावसाचे पुनरागमन! 'या' भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; अलर्ट जारी

मुंबई : राज्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी

Kalachowki Mahaganpati : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना! काळाचौकीच्या महागणपती मंडप परिसरात विजेचा धक्का; दोन जणांचा मृत्यू

काळाचौकीच्या महागणपती मंडप परिसरात मोठी दुर्घटना! शॉक लागून 2 जणांचा मृत्यू, अनेक जखमी मुंबई : यंदाच्या