मुंबई : मुंबईत अपघातांची मालिका सुरुच आहे अशातच कोस्टलरोडवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. मरीन ड्राईव्हहून हाजी अलीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या BMW कारचा लाला कॉलेजसमोरील, लोटस जेटीजवळ अपघात झाला. भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Mumbai Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 5.20 वाजता हा अपघात झाला. घटनेची माहिती कोस्टल रोड कंट्रोल रूमकडून देण्यात आली. अपघातानंतर कारमधील 4 जणांना उपचारासाठी नायर रुग्णालयात नेण्यात आले. (Accident News)
ठाणे: कळवा पोलिसांनी गुटख्याचा अवैध पद्धतीने व्यापार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून गुटखा विक्रीच्या तस्करीचा डाव उधळला ...
नायर रुग्णालयाच्या CMO कडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील 4 जणांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. शनय गज्जल (वय 21) आणि धिर्या सेठ (वय 17) यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर 25 वर्षीय आणखी एका तरुणाचाही मृत्यू झाला आहे. त्याची ओळख अद्याप समोर आलेली नाही. ( BMW Accident)
या अपघातातील आणखी एक 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नायर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पहाटेच्या सुमारास कोस्टल रोडवर हा अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली. BMW कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण आणि वाहनाचा वेग याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.