नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचे वयाच्या 46 व्या वर्षी अचानक निधन झाले. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पायल मेहता यांनी राजकीय आणि राष्ट्रीय विषयांवर दीर्घकाळ पत्रकार म्हणून काम केले होते. (Payal Mehta)
पायल मेहता यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत पायल मेहता यांच्या पत्रकारितेतील कामाची आठवण काढली.
Payal Mehta Ji was a hardworking journalist who remained firmly connected to the ground, bringing a deep understanding of national issues to her reporting. Beyond her work, she will be remembered for the kindness and warmth with which she touched so many lives. Her sudden and… pic.twitter.com/4uG7MmzGol
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2026
मुंबई : कतरिना कैफ नुकतीच पती विक्की कौशलसोबत गणपती उत्सवात सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या वाढलेल्या वजनावरून आणि बदललेल्या लूकवरून सोशल मीडियावर ...
मोदी यांनी पायल मेहता या मेहनती आणि जमिनीशी जोडलेल्या पत्रकार असल्याचे म्हटले. राष्ट्रीय विषयांची त्यांना चांगली जाण होती आणि त्याचा प्रभाव त्यांच्या वार्तांकनातून दिसून येत होता, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या कामासोबतच इतरांशी आपुलकीने वागण्याच्या स्वभावाचीही मोदी यांनी आठवण केली.
राजनाथ सिंह यांनीही पायल मेहता यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. संसद अधिवेशनाच्या काळात त्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत संसदेत उपस्थित राहून कामकाजाचे वार्तांकन करत असत. पत्रकारितेप्रती त्यांची असलेली निष्ठा आणि कामातील सातत्य याचा उल्लेख राजनाथ सिंह यांनी केला.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पायल मेहता यांना संवेदनशील आणि मेहनती पत्रकार म्हणून आठवले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले. जे. पी. नड्डा यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत पत्रकारितेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे स्मरण केले.
पायल मेहता यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत राजकीय घडामोडी आणि संसदेतील कामकाजाचे वार्तांकन केले. त्यांच्या अचानक निधनामुळे सहकारी पत्रकार आणि त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींमध्ये दुःखाचे वातावरण आहे.






