ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी आणि रिक्षाचालकांमधील संघर्ष, भाड्याबाबतची अनिश्चितता आणि रिक्षांच्या रांगांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ठाण्यातील पहिल्या प्रिपेयड रिक्षा उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यामुळे ठाणेकरांचा प्रवास आता अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.(Prepaid Auto Rickshaw Thane)
उपक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट
स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ, ठाणे आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे रेल्वे स्थानक येथे हा पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांमधील वाद आणि प्रवाशांशी होणारे संघर्ष टाळण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या उपक्रमाबाबत सतत पाठपुरावा केला जात होता. अखेर विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींवर मात करत या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. याप्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत, तसेच युनियनचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.
मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे ते पांजरापूरदरम्यान जलबोगदा उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने पूर्वमंजुरी दिली आहे. मुंबई महापालिका ...
पारदर्शक व्यवस्था आणि चालकांसाठी विशेष सुविधा
या उपक्रमांतर्गत प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच निश्चित भाड्याची माहिती मिळणार असल्याने भाड्याबाबतची अनिश्चितता पूर्णपणे दूर होणार आहे. तसेच, रिक्षाचालकांच्या दैनंदिन कमाईचा व्यवहार लक्षात घेऊन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. याविषयी बोलताना आ. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, "सकाळपासून दिवसभर केलेल्या व्यवसायाचा संपूर्ण हिशेब संध्याकाळी घरी जाताना रिक्षाचालकाच्या बँक खात्यात जमा होईल. सर्व रिक्षाचालकांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जाणार असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याचा मोठा फायदा होईल." याशिवाय, या सुविधेसाठी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि 'सिटीफ्लो' यांचे विशेष आभार मानले.(Prepaid Auto Rickshaw Thane)
या शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रीपेड रिक्षा सेवेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासासाठी येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील कटू प्रसंग व वाद टळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.