Pimpri Chinchwad Crime News : कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार, IT इंजिनिअर पतीनेही दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत...

Pimpri Chinchwad Crime News : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार देहुगाव परिसरात समोर आला आहे. 26 वर्षीय आयटी इंजिनिअर पतीने पत्नीवर हल्ला केल्यानंतर स्वतःलाही जखमी करून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



 कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार


देहुगावातील ओमकार सोसायटी परिसरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शुभांगी आकाश बारस्कर (वय 28) या घरातील खोलीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, शुभांगी यांचे पती आकाश रामदास बारस्कर (वय 26) हेही सोसायटीच्या परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



पोलिसांना गस्ती दरम्यान मिळाली माहिती


देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या माहितीनुसार, सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एका व्यक्तीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आकाश हे रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळले. यानंतर पोलिसांनी सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत तपास केला असता शुभांगी बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुभांगी यांच्या मृतदेहाचं वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.



लग्नानंतर काही दिवसांतच वाद


आकाश आणि शुभांगी यांचा विवाह डिसेंबर 2023 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होऊ लागल्याची माहिती आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून हे दाम्पत्य ओमकार सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होतं. आकाश हे आयटी इंजिनिअर असून हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत कार्यरत आहेत. तर शुभांगी खासगी कंपनीत नोकरी करत होत्या.



पत्नीच्या हत्येनंतर पतीने उडी मारल्याचा प्राथमिक संशय


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सततच्या कौटुंबिक वादातून आकाश यांनी शुभांगी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःलाही जखमी करून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, हल्ला कशामुळे झाला आणि घटनेपूर्वी नेमकं काय घडलं, याचा तपास देहूरोड पोलिसांकडून सुरू आहे. आकाश यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Parth Pawar : पार्थ, सावध हो! 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत बारामतीमधील भावनिक पत्राची चर्चा

- अजित पवार कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रातून दावा मुंबई : बारामती

Asian Games 2026 : सुचिका तरियालने रचला इतिहास ! मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये भारताला पहिलं कांस्यपदक

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये (MMA) इतिहास रचला आहे. 36 वर्षीय

Prime Minister Meloni : इटलीच्या शाळांमध्ये बुरखा-नकाबवर बंदी येणार; पंतप्रधान मेलोनींचा मोठा निर्णय, कारण असं की...

इटली : युरोपियन देशात बुरख्यावर बंदी घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. फ्रान्स, (France) ऑस्ट्रिया (Austria) आणि

Maharashtra Drought : राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या दिशेने हालचाली?

तांत्रिक बाबींचे विश्लेषण सुरू; पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, जलाशयांचा साठा आणि ‘एनडीव्हीआय’ची माहिती

Nashik Crime News : वाहनातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांना संशय आला अन्...; बंद चारचाकीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Nashik Crime News : नाशिकशहरात एकीकडे गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू असतानाच, दुसरीकडे पंचवटीतील अत्यंत वर्दळीच्या

Boat License : बोट, हाऊसबोट, क्रूझ परवान्यांना आता 'सेवा हमी कायद्या'चे बंधन

११ सेवांसाठी कालमर्यादा निश्चित; जलक्रीडेची परवानगी तीन दिवसांत, हाऊसबोट-क्रूझ परवाना १५ दिवसांत मुंबई : कोकण