Nashik : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात असतानाच शासकीय अनुदान आणि नुकसानीच्या पंचनाम्यांबाबतही शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील ५४ कृषी मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला असून, त्यापैकी १५ मंडळांमध्ये ४० दिवसांहून अधिक काळ पावसाने ओढ दिली आहे. मालेगाव, सिन्नर व येवला प्रत्येकी आठ, नांदगाव सात, तर बागलाण व कळवण प्रत्येकी सहा कृषी मंडळांचा दीर्घ पावसाच्या खंडात समावेश आहे.
नांदगाव तालुक्यातील मांजरे गावातील शेतकऱ्यांनी खरीप २०२५ च्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे दोन वेळा सादर करूनही निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. तसेच मांजरे व शिरसोंडी परिसरात मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार जीवन सोनवणे यांनी पाहणी केली होती.
Nashik : गणेश विसर्जन मिरवणुका आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह ...
आमदार सुहास कांदे यांनीही शिरसोंडी व मांजरे परिसरातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरसोंडीतील बाधित शेतकऱ्यांना गारपीट अनुदान मिळाले; मात्र मांजरेतील शेतकऱ्यांचे पंचनामेच झाले नसल्याची तक्रार आहे. ग्रामपंचायतीने याबाबत तहसीलदारांकडे निवेदन देऊन चर्चेसाठी संबंधित तलाठ्यांना ग्रामसभेत उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मात्र तलाठी उपस्थित राहिले नाहीत.
त्यामुळे कामात दिरंगाई, सतत गैरहजेरी आणि शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत ग्रामसभेत चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील केवळ ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा घेतल्याची माहिती समोर आली आहे. विमा नसलेल्या बाधित शेतकऱ्यांनाही शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली