Solapur Crime News : सुनेबद्दल वाईट बोलले अन् आजीबाईंनी थेट 70 वर्षीय प्रियकरालाच संपवले ; सुनेला...

Solapur Crime News : गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या दोन वृद्धांच्या प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट झाला आहे. प्रियकराने आपल्या सुनेबद्दल अपशब्द काढल्याने संतापलेल्या 70 वर्षीय महिलेने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आला आहे. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मंगल होनमाने यांना पोलिसांनी अटक केली आहे.



15 वर्षांच्या प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट


पंढरपूर तालुक्यातील शंकर गाव येथील 70 वर्षीय अंबादास खांडेकर आणि त्याच वयाच्या मंगल होनमाने यांच्यात गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंबादास हे नियमितपणे मंगल यांच्या घरी ये-जा करत होते. त्यांच्या संबंधांची गावात चर्चा असली तरी त्याबाबत कोणी उघडपणे बोलत नव्हते.



सुनेबद्दल बोलल्याने वाद


पोलिसांच्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी अंबादास हे मंगल यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी मंगल यांच्या सुनेबद्दल कथितरित्या अपशब्द काढले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर मंगल यांनी कोयत्याने अंबादास यांच्यावर वार केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या हल्ल्यात अंबादास यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये, यासाठी मृतदेह एका शेतात नेऊन अर्धवट जाळण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.



कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार


दरम्यान, अंबादास हे मुलीकडे गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी 30 जुलै रोजी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपास सुरू असतानाच 2 ऑगस्ट रोजी पोलिसांना अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आणि हाडांचा सांगाडा आढळून आला. हा मृतदेह अंबादास खांडेकर यांचा असावा, असा पोलिसांना संशय आला. मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांनी अंबादास यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने घेतले. डीएनए तपासणीनंतर मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत मंगल होनमाने यांची चौकशी केली. पोलिसांच्या तपासानुसार, हत्येमागे दोघांमधील वाद आणि सुनेबद्दल केलेले कथित वक्तव्य कारणीभूत असल्याचे समोर आले.



अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक


अंबादास यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तपास पूर्ण करत मंगल होनमाने यांना अटक केली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगल होनमाने यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

ट्रेनमधून सायकल आणि स्कूटर कसं घेऊन जाऊ शकता? बुकिंग करण्याची प्रोसेस समजून घ्या

तुम्ही ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्लॅटफॉर्म आल्यानंतर अनेकदा ट्रेनमधून वाहन घेऊन जात असल्याचं पाहिलं असेल.

CM Devendra Fadnavis : राजकीय मागण्यांत रस नाही; विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करू! - एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

- पुढील परीक्षेत विक्रमी पदे आणण्याचा निर्णय मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटी

Jalgaon Crime News : मामेभावाची दगडाने ठेचून हत्या ; संशयित आरोपीने कबुतरे आणि मृताचे दात बॅगेत ठेवले अन्...

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बनावट रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या ८००

GK: पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात जावे लागते का? वाचा काय आहेत नियम!

विदेशवारी करायचं म्हंटलं तर पासपोर्ट हवाच. त्याशिवाय विदेशवारी करूच शकत नाही. पण पासपोर्ट काढताना अनेकदा

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी समिती, शेतकऱ्यांना विकसित भूखंड

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी 22 सप्टेंबर 2026 रोजी झाली. या बैठकीत दुष्काळ निवारणासह मुंबईतील

Devendra Fadnavis : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ समिती

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार मुंबई : राज्यावर