BMC Slum Demolition : मुंबईतील झोपड्यांच्या 14 फुटांवरील वाढीव बांधकामांवर हातोडा पडणार की नाही?

महापालिका सभागृहनेत्यांनीही कारवाईला स्थगिती देण्याची केली आयुक्तांकडे मागणी


यापूर्वी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या कारवाईला केला होता विरोध


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईतील 14 फुटांच्या वरील झोपड्यांवरील बांधकामांवर हातोडा चालवण्याची मोहिम जाहीर केली. मात्र, ही मोहिम जाहिर करताच याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केल्यानंतर आता सत्ताधारी भाजपनेही विरोध केला आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून मुंबईकर रहात असून, मुंबई महानगरपालिकेतर्फे या विषयामध्ये गरीब मुंबईकरांना त्रास होईल असे मुंबई महानगरपालिकेकडून कुठलेही पाऊल उचलले जाणे अपेक्षित नसून, आपण या संदर्भात जर अशा काही सूचना दिल्या असतील तर त्याला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी भाजपचे गटनेते आणि महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की,प्रशासनाच्यावतीने मुंबई शहरातील झोपडप‌ट्टी क्षेत्रातील 14 फूटाच्यावर असलेल्या झोपडयांना नोटीसा देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. 40 टक्के मुंबई ही झोपडपट्टी क्षेत्रामध्ये मोडते. महाराष्ट्र शासनाने एसआरए मार्फत मोठ्या प्रमाणावर झोपडप‌ट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध ठिकाणी क्लस्टर योजनांच्या तसेच, अन्य योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून, युध्द पातळीवर मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडुन करण्यात येत आहेत.


मुंबईमध्ये अनेक वर्षापासून मुंबईकर रहात असून, मुंबई महानगरपालिकेतर्फे या विषयामध्ये गरीब मुंबईकरांना त्रास होईल असे मुंबई महानगरपालिकेकडून कुठलेही पाऊल उचलले जाणे अपेक्षित नाही. आपण या संदर्भात जर अशा काही सूचना दिल्या असतील तर त्याला त्वरित स्थगिती द्यावी. तसेच, धोकादायक असलेल्या झोपडप‌ट्टी क्षेत्रातील काही बांधकामे ज्याच्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता असेल अशा बांधकामावरच आपण योग्य ती पाऊले उचलावी व आपण अशा प्रकारच्या नोटीसा सरसकट देऊ नये. असे झाल्यास मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो व गरीब मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू शकतो याची नोंद घ्यावी, असा भीतीवजा इशारा दिला आहे.


दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात जोरदार प्रतिक्रिया देत मुंबईतील 39 हजार झोपड्या तोडण्याचा महापालिकेचा तुघलकी निर्णय असून महापालिकेच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. तर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी 14 फुटांपेक्षा उंच झोपडीबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी अशी असे सांगत लाखो झोपडपट्टीवासियांना बेघर करण्याच महापालिकेच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.

Comments
Add Comment

Disha Salian Case : 'तो मोठा खुलासा करणारच होता अन्...' दिशा सालियन प्रकरणात सुशांतच्या भावाच्या दाव्याने खळबळ

मुंबई : मुंबईतील दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Mumbai Water Supply : मध्य वैतरणा तलाव भरला ; भातसाही रांगेत

तलाव क्षेत्रात ९७.७७ टक्के पाणीसाठा मुंबई (विशेष प्रतिनिधी.) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तानसा,

BMC New Policy : महापालिकेच्या मालमत्तांच्या पुनर्विकासाचे नवीन धोरण

महापालिकेच्या तिजोरीत आता वाढणार निधी वाढीव एफएसआयवर आकारणार प्रिमियम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Ganpati Decoration Safety : सजावट आणि रोषणाई आकर्षक असली तरी भाविकांचा जीव महत्वाचा

विद्युत सुरक्षेबाबत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळाचौकी येथे

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शाहरुख खानची हजेरी; कुटुंबासह घेतले बाप्पाचे दर्शन

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध आणि मानाच्या अशा 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी

Mumbai News: मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा, रस्त्यामध्ये हरवलेली 2 लाख 90 हजार रूपये असलेली पिशवी मालकाला शोधून दिली...

मुंबई: मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीचे हरवलेले तब्बल 2 लाख 90 हजार रूपये शोधून दिले आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या