Maharashtra Weather : मान्सूनच्या परतीच्या काळात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह 13 राज्यांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत सध्या पावसाची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 13 राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. ( Maharashtra Weather)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांतून मान्सूनच्या माघारीसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो.


हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन डीप डिप्रेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून समुद्राची स्थितीही खराब राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागावर या हवामान प्रणालीचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये 23 ते 24 सप्टेंबरदरम्यान, तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी पावसामुळे स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ( Monsoon)


दरम्यान, 23 सप्टेंबर रोजी केरळ, राजस्थान, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालय या 13 राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.


महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे पावसाचा जोर वाढू शकतो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि सोलापूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. ( Heavy rainfall)


Comments
Add Comment

Raj Thackeray : जाती-पातीत अडकू नका, शिक्षणव्यवस्थेतील दोषांवर प्रश्न विचारा ! साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांची भूमिका

विद्यार्थ्यांना आंदोलनाची दिशा भरकटू न देण्याचे आवाहन मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे या २० वर्षीय

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल

पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Sunetra Pawar : दुष्काळी स्थितीमुळे राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले

- नाशिकमध्ये २७ सप्टेंबरला होते नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय मुंबई : दिवंगत अजित पवार

Maharashtra Government : दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द

- कायमस्वरूपी अपंगत्वासाठी प्रमाणपत्र एकदाच; तात्पुरत्या अपंगत्वासाठी पाच वर्षांनी प्रमाणपत्र सादर करण्याची

Eknath Shinde : आधुनिक सुविधांनी सज्ज १०८ रुग्णवाहिका लवकरच सेवेत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत नव्या १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत