Wednesday, September 23, 2026

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात? २४ सप्टेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात? २४ सप्टेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)

ई-केवायसीनंतर १ कोटी ६६ लाख महिला पात्र

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी सुमारे १ कोटी ६६ लाख महिला पात्र असल्याची माहिती समोर आली आहे. पात्र महिलांना राज्य सरकारकडून दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. (Ladki Bahin Yojana)

ऑगस्टचा हप्ता रखडण्यामागे काय कारण?

ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेत मिळण्याची अपेक्षा असताना, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. आता हप्ता वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.(Ladki Bahin Yojana)

हप्ता नेमका कधी जमा होणार?

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. २४ सप्टेंबरनंतर पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी ही अधिकृत तारीख नाही. त्यामुळे हप्ता नेमक्या कोणत्या दिवशी मिळणार, हे सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. (Ladki Bahin Yojana)

लाभार्थी महिलांनी हप्ता जमा होण्याच्या निश्चित तारखेसाठी राज्य सरकारच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >