
मुंबई : मुंबईत 8 नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी आणि अंधेरी पूर्व परिसरात गॅरेजला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही ठिकाणी मुंबई अग्निशमन दलाने (MFB) धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनांमध्ये कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
मियामी (फ्लोरिडा): आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. इंटर मियामी सीएफ ...
डोंगरीतील गॅरेजला लेव्हल-1 आग
डोंगरी येथील हाजी कासम चाळ, डॉ. महेश्वरी रोडवरील दत्त मंदिराजवळील एका गॅरेजमध्ये 8 नोव्हेंबर रोजी रात्री 9:57 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. रात्री 10:11 वाजता या आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याची नोंद नव्हती.
अंधेरीतील गॅरेजमधील आग लेव्हल-2 घोषित
दुसरी घटना अंधेरी पूर्व येथील मरोल मिलिटरी रोडवर, प्राइम अकॅडमी शाळेजवळ घडली. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 10:51 वाजता या ठिकाणी गॅरेजला आग लागल्याची माहिती मिळाली. रात्री 11:35 वाजता मुंबई अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल-2 घोषित केले.
आग गॅरेजपुरती मर्यादित असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, अदानी आणि वॉर्ड कर्मचारी दाखल झाले. या घटनेतही दुखापत झाल्याची नोंद नव्हती.
दोन्ही घटनांमधील आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. अग्निशमन दलाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.






