Wednesday, September 23, 2026

Bhingar Clashes : भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा! पोलिसांच्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhingar Clashes : भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा! पोलिसांच्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू
अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळल्यामुळे तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे सदस्य दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंगार परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक पोलिसांनी काही गणेशभक्तांवर सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी कोणतेही स्पष्ट कारण नसताना लाठीचार्ज केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

तरुणाचा मृत्यू; आमदार जगताप यांनी मांडली भुमिका

गणेशभक्तांकडील गुलालाच्या गोण्या आणि भगवे ध्वज पोलिसांनी हिसकावून घेतल्याचाही आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. या घटनेत दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही...

घटनेनंतर भिंगार परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुका काही काळ थांबवण्यात आल्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई होईपर्यंत नगर शहरातील गणेश विसर्जन होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, विसर्जन मिरवणुकीबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >