पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावात वडिलांनी स्वतःच्या 24 वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (23 सप्टेंबर) सायंकाळी घडली. हल्ल्यानंतर फरार झालेल्या वडिलांना पोलिसांनी अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. (Poladpur Crime News)
नाशिक: गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी आले असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बजरंग चिकणे हे काही महिन्यांपूर्वी मुंबईहून पोलादपूर शहराजवळील लोहारे देऊळकोंड परिसरातील निर्जन इमारतीत राहण्यास आले होते. मंगळवारी सायंकाळी अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून त्यांनी मुलगा साहिल सचिन चिकणे (24) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.(Poladpur Crime News)
तुम्हाला व्हॉट्सॲपवर लग्नाचं निमंत्रण देणारी पत्रिका आली आहे का? तर ती डिजिटल पत्रिका ओपन करण्यापूर्वी जरा थांबा.. ही बातमी वाचा आणि नंतर ठरवा.. कारण ...
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहिलचा मृत्यू झाला. घटनेनंतर सचिन चिकणे घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत त्यांना पाच तासांत ताब्यात घेतले. साहिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.(Poladpur Crime News)






